Metro Car Shade sakal
मुंबई

Metro Car Shade : मेट्रो-६ कांजूरमार्ग कारशेड उभारणीला वेग

मेट्रो-६ मार्गिकेसाठी प्रस्तावित कांजूरमार्ग डेपोच्या कामासाठी जमीन सर्वेक्षण आणि इतर कामांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने निविदा मागविली आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मेट्रो-६ मार्गिकेसाठी प्रस्तावित कांजूरमार्ग डेपोच्या कामासाठी जमीन सर्वेक्षण आणि इतर कामांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने निविदा मागविली आहेत. एप्रिल महिन्यात कांजूरमार्ग डेपोची जमीन राज्य सरकारने एमएमआरडीएला हस्तांतरित केली आहे. त्यानंतर आता एमएमआरडीएने प्रकल्प उभारणीसाठी निविदा प्रक्रिया सुरु केली आहे.

स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी (पूर्व द्रुतगती मार्ग) या मेट्रो ६ मार्गिकेसाठी कांजूरमार्ग येथे एमएमआरडीएच्या माध्यमातून मुख्य डेपोची उभारणी करण्यात येणार आहे. १५ हेक्टर जागेत हा कारडेपो उभारण्यात येईल.

कांजूरमार्ग येथील डेपो उभारणीला सुरुवातीपासूनच विरोधाचे ग्रहण लागलेले असताना आता मात्र डेपो उभारणीला गती देण्यासाठी एमएमआरडीए प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. एप्रिल महिन्यात राज्य सरकारने कांजूरमार्ग डेपोसाठी ही जागा एमएमआरडीएला हस्तांतरित केली.

त्यानंतर एमएमआरडीएच्या माध्यमातून याठिकाणी सर्व्हेक्षण करण्यासाठी मिठागरे आयुक्तालयाने विरोध दर्शविला होता. मात्र त्यानंतर आता एमएमआरडीएने हे सर्वेक्षण सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली करण्याचा निर्णय घेतला आहे. सल्लागार नियुक्तीसाठी एमएमआरडीएने निविदा मागविल्या आहेत. या निविदा भरण्याची अखेरची तारीख ६ ऑक्टोबर आहे.

यासोबतच, यासोबत सर्व्हेक्षण सल्लागारासोबतच इतर स्थापत्य उभारणीसह ५०६ कोटीच्या कामासाठीही एमएमआरडीएने निविदा प्रक्रिया सुरु केली आहे.

यासाठी जरी केलेल्या निविदेनुसार, स्टेबलिंग यार्ड, डेपो नियंत्रण केंद्र आणि संचलन नियंत्रण केंद्र, प्रशासकीय इमारत, देखभाल आणि कार्यशाळा इमारती, सहाय्य्क सबस्टेशन, फिनिशिंग, प्लम्बिंग, जमिनीच्या विकासासाठी मातीकाम, संरक्षण भिंत, रास्ता, सेवा वाहिनी, पर्जन्यजलवाहिन्या, इ.टी.पी./ एस.टी.पी., जल पुनर्भरण/ आवश्यक कर्मचारी निवास या कामांसाठी या निविदा जरी करण्यात आली आहे.

ही कामे पूर्ण करण्यासाठी ३० महिने म्हणजेच अडीच वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे. निविदा प्रक्रियेतील कामकाजाचा कालावधी बघता कांजूरमार्ग डेपो उभारणीसाठी अजून अंदाजे ३ वर्षांचा कालावधी लागणार आहे. मात्र सद्यस्थितीत मेट्रो ६ मार्गिकेची कामे डिसेंबर २०२४पर्यंत पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. त्यामुळे कारशेडच्या कामामुळे मेट्रो मार्गिका सुरु होण्यास विलंब होण्याची शक्यही वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Ujani Dam: “उजनी धरणात ११० टीएमसी पाणी, तरी भीमा नदी कोरडी! इंदापूरमध्ये पाणीटंचाईचे संकट”

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

SCROLL FOR NEXT