मुंबई

समन्वयाचा अभाव! मान्यता नसतानाही सॅनिटायझर बसची निर्मिती सुरूच 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कर्नाटक परिवहन महामंडळाच्या सॅनिटायझर बसची छायाचित्रे आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या कामगारांनी अशी वाहने तयार करण्याचा सपाटा लावला आहे. परंतु, निर्जंतुकीकरण बसला व्यवस्थापकीय संचालकांनी अद्याप मान्यता दिलेलीच नाही. 

कुर्ला, औरंगबाद, नागपूर, दापोली, ठाणे, लातूर येथील एसटी कार्यशाळांमध्ये आतापर्यंत एक-दोन सॅनिटायझर बस बांधण्यात आल्या आहेत. बसमधील आसने काढून जंतूनाशक रसायनाचे मिश्रण, मोटर आणि स्प्रिंकलर यंत्रणा बसवण्यात आली आहे. परंतु, या तंत्राचा फायदा होत नसल्याचे एका अधिकाऱ्यानेच सांगितले. फवारणीसाठी वापरले जाणारे रसायन प्रमाणित नसल्यामुळे एसटी कामगारांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरण्याचीही शक्‍यता आहे. 

एसटी आगारांतील कामगार उत्स्फूर्तपणे सॅनिटायझर बस तयार करत आहेत. त्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे महामंडळाचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले. त्यामुळे कोणाच्या आदेशावरून हे काम केले जात आहे, याचा उलगडा झालेला नाही. मान्यता नसूनही अशा निर्जंतुकीकरण वाहनांची निर्मिती सुरूच आहे. दरम्यान, टाकाऊ वस्तूंपासून "जुगाड' करून एसटी कामगारांनी बांधलेल्या या सॅनिटायझर बस वापरायच्या कुठे, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

वृद्ध, दिव्यांग कर्मचाऱ्यांचा त्रास कमी होणार, कार्यालयांत विशेष सुविधा मिळणार; पालिकेचा महत्त्वाचा निर्णय

MLA Randhir Savarkar: शेतकऱ्यांच्या पीक कर्ज फेडीची मुदत ३० जूनपर्यंत वाढवावी: आमदार रणधीर सावरकर, अन्याय दूर करा!

Eknath Shinde: शिवसेना-भाजपमध्ये नाराजी? एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; भाजपची तक्रार करत अमित शहांना मनातील खदखद सांगणार!

Indian Army Agniveer Bharti : भारतीय लष्करात अग्निवीरांसाठी मेगा भरती; ऑनलाईन प्रक्रिया सुरु, घरबसल्या कसा अर्ज करायचा? पाहा

SCROLL FOR NEXT