Navi Mumbai sakal
मुंबई

Navi Mumbai Murder: सीवूड्स भागात बांधकाम व्यवसायिकाची हत्या

पोलिसांकडून मारेकऱयाचा शोध सुरु

सकाळ वृत्तसेवा

Navi Mumbai Murder: उलवे भागात राहणाऱया एका बांधकाम व्यवसायीकाची सीवूड सेक्टर-44 मधील त्याच्या कार्यालयात डोक्यात गोळ्या झाडुन हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

मनोज सिंग (39) असे या बांधकाम व्यावसायीकाचे नाव असून शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास त्याच्या कार्यालयात काम करणाऱया दोन मुली कार्यलयात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर एनआरआय पोलिसांनी अज्ञात मारेकऱयाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मनोज सिंग याची हत्या त्याच्या जवळच्याच व्यक्तीने केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून मारेकऱयाचा शोध सुरु केला आहे.

या घटनेतील मृत मनोज सिंग हा उलवे भागात राहण्यास होता. तसेच सीवूड सेक्टर-44 भागात त्याचे अमन डेव्हलपर्स नावाचे कार्यालय आहे. मनोज सिंग याचे उलवे परिसरात काही इमारतीच्या बांधकामाचे प्रकल्प सुरु होते. शुक्रवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास मनोज सिंग याने आपल्या पत्नीला फोन करुन त्याला भेटण्यासाठी कार्यालयात काही व्यक्ती येत असल्यामुळे त्याला घरी पोहोचण्यास उशीर होत असल्याचे तसेच पत्नी व मुलांना जेवून झोपण्यास सांगितले होते.

तसेच जास्त उशीर झाल्यास रात्री कार्यालयातच झोपणार असल्याचे देखील मनोज सिंग याने पत्नीला सांगितले होते. यापुर्वी देखील मनोज सिंग हा कामानमित्त उशीर झाल्याने आपल्या कार्यालयात थांबला होता. त्यामुळे मनोज सिंगची पत्नी निश्चींत राहिली.

यादरम्यान, शुक्रवारी रात्री उशीरा मनोज सिंग याला भेटण्यासाठी त्याच्या कार्यालयात आलेल्या अज्ञात व्यक्तीने मनोज सिंग याच्या डोक्यात दोन गोळ्या झाडुन त्याची हत्या करुन पलायन केले. शनीवारी सकाळी 11 च्या त्याच्या कार्यालयातील दोन मुली कामावर आल्यानंतर मनोज सिंग रक्ताच्या थारोळयात पडल्याचे निदर्शनास आले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एनआरआय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे. या घटनेनंतर एनआरआय पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरुन मारेकऱयाचा शोध सुरु केला आहे. मनोज सिंग याला धमकीचे फोन येत आल्याचे बोलले जात आहे. त्यादृष्टीने देखील पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

गत मार्च महिन्यामध्ये सावजीभाई मंजेरी (54) या बांधकाम व्यवसायीकावर दोघा सख्या भावांनी नेरुळ सेक्टर-6 मध्ये गोळीबार करुन त्यांची हत्या केल्याची घटना घडली होती. सावजी भाई यांच्या गावाकडील वादातून त्यांच्या विरोधकांनी सुपारी देऊन त्यांची हत्या घडवून आणल्याचे तपासात उघडकीस आले होते. नेरुळ पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन दोघे मारेकरी व या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर आरोपींना अटक केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मातीत राबणारेच मातीला मिळाले! महाराष्ट्रात 8 महिन्यांत तब्बल 1183 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, धक्कादायक आकडेवारी समोर...

Pregnant Woman Killed : पतीकडून गर्भवती पत्नीचा मोटारीने उडवून खून, अपघात भासविण्याचा प्रयत्न; सासू, पतीकडून वारंवार छळ

France Mosque Incident : धक्कादायक! नऊ मशिदींबाहेर आढळली डुकरांची मुंडकी; पाच मशिदींवर राष्ट्रपतींचं निळ्या रंगात लिहिलं नाव, मुस्लिम समाजात तीव्र संताप

Nepal Royal Massacre: कशी संपली होती नेपाळची राजेशाही ? राजकुमाराने राजा-राणीसह राजघराण्यातील 9 जणांची केली होती हत्या अन्..

T20 World Cup 2026 Date: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची तारीख आली समोर, फायनल नरेंद्र मोदी स्टेडियमवर...१५ संघ पात्र, ५ जागा शिल्लक...

SCROLL FOR NEXT