नालासोपारा ः पीएमसी बॅंकेच्या ग्राहकांनी मंगळवारी केलेला "रास्ता रोको'.  
मुंबई

पीएमसी बॅंकेच्या ग्राहकांचा जमापुंजीसाठी टाहो

सकाळ वृत्तसेवा

नालासोपरा : पंजाब ॲण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बॅंकेने सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादल्याने मंगळवारपासून (ता.२४) या बॅंकेतील ग्राहकांना फक्त हजार रुपयेच काढता येणार आहेत. याबाबतचा संदेश बॅंकेतर्फे ग्राहकांना मिळताच आज सकाळपासून वसई, विरार, नालासोपाऱ्यात पीएमसी बॅंकेच्या शाखेत ग्राहकांनी मोठी गर्दी करत कर्माचाऱ्यांना घेराव घातला.

‘आम्हाला आमचे पैसे द्या, आमचे पैसे मिळालेच पाहिजेत’ अशी मागणी करत शाखेमध्ये ग्राहकांनी गोंधळ घातला होता. नालासोपारा सेन्ट्रलपार्क रस्त्यावर रास्ता रोको करून ग्राहकांनी उद्रेकाला वाट मोकळी करून दिली.

अनेक वयोवृद्ध महिला, पुरुष, गृहिणी, महिला यांनी आता आमचे पैसे मिळणार नाहीत, या भीतीने टाहो फोडला. पीएमसी बॅंकेचे आर्थिक व्यवहार सहा महिन्यांसाठी बंद करण्यात आल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला. आयुष्यभर कष्ट करून कमावलेला पैसे सुरक्षिततेसाठी बॅंकेमध्ये ठेवले. या पैशातूनच पूर्ण महिनाभराचा आर्थिक गाडा हाकला जात होता, तो आता चालवायचा कसा, असा प्रश्‍न ज्येष्ठांनी उपस्थित केला. 

घराचे हप्ते, मुलांचा शैक्षिणिक खर्च, घरगुती सामान, औषधांचा खर्च, तसेच व्यापाऱ्यांचे देणे, कर्मचारी पगार, हप्ते आता थकणार या भीतीने ग्राहकांनी बॅंकेत आणि बाहेर गर्दी केली होती. त्यांचा उद्रेक पाहून स्थानिक पोलिसांनी त्यांना आवरण्याचाही प्रयत्न केला; पण नागरिकांच्या संतापाचा पारा काही केल्या कमी झाला नाही. 

आता कसे होणार?
बॅंकेसमोर जमलेल्या ग्राहकांनी पैसे परत देण्याचा तगादा लावला होता. काहींना भीतीने अश्रू अनावर झाले. आज दिवसभर ग्राहकांनी बॅंकेत गर्दी केली; पण बॅंक कर्मचाऱ्यांकडून कोणतेही ठोस उत्तर त्यांना मिळाले नाही. त्यामुळे आता आमचे कसे होणार, पैशांचे काय या चिंतेने ग्राहक भयभीत झाले आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs JPN : मोठा वाद! श्रेयस अय्यर भांडला, अम्पायरने निर्णय बदलला; तसं नसतं झालं तर जिंकला असता जपान, नेमकं काय घडलं ?

आता फक्त Call-SMSचा प्लान, कंपन्यांना बंधनकारक; रिचार्ज होणार स्वस्त, TRAIचा मोठा निर्णय

बाप्पाचं दर्शन घेतलं अन् आठवणीने मागितली ती गोष्ट; दर्शनासाठी गेलेल्या शाहरुख खानच्या त्या कृतीने जिंकली मनं; नेटकरी फिदा

Mark Wood Retirement: दोन वर्ल्ड कप जिंकणाऱ्या स्टार खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा; ३६ व्या वर्षी घेतला मोठा निर्णय

दुष्काळाची अधिसूचना शनिवारपर्यंत, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT