मुंबई

कंत्राटदाराच्या कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड

CD

कंत्राटदाराच्या कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड
घाटकोपर, ता.५ (बातमीदार) : पवईच्या चांदिवली येथील मारवा पुलाचे बांधकाम गेले तीन वर्ष कासव गतीने सुरू आहे. याविरोधात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी बुधवार (ता. ५) पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराचे कार्यालय व जेसीबी ची तोडफोड केली. शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा प्रमुख अशोक माटेकर, माजी नगरसेविका अश्विनी माटेकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले.
पवईहून अंधेरी एमआयडीसी, मरोळकडे जाण्यासाठी हा मारवा पूल जवळचा रस्ता आहे. २०२१ रोजी हा पूल धोकादायक झाल्याने पालिकेने तो बंद करत हा या पूलाची नव्याने उभारण्याचे काम हाती घेतले. या कामाचे ११ कोटीचे कंत्राट ए आर कन्स्ट्रॅक्शन या कंपनील जानेवारी २०२२ देण्यात आले. ३१ डिसेंबर २०२३ या दोन वर्षांच्या कालावधी हा पुल उभा करण्याची मुदत होती. मात्र अद्यापही या पुलाचे काम कासव गतीने सुरू असून पालिकेने पुन्हा मे २०२४ पर्यंत कंत्राटदाराला मुदत वाढून देत तीन कोटींचा निधी ही वाढवून दिला. मात्र या वेळेत ही काम पूर्ण झाले नसल्याने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी या पुलाजवळ आंदोलन केले. या वेळी पुढील दहा ते पंधरा दिवसांत जर हा पूल नागरिकांसाठी खुला केला नाही तर पालिकेच्या पूल विभागासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा या वेळी अशोक माटेकर यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price Today: नवरात्रीत सोन्याच्या दरात मोठी घसरण! चांदीही 13,500 रुपयांनी स्वस्त; 22 आणि 24 कॅरेटचा ताजा भाव किती?

जॅक मॅकगर्कची १४ चेंडूंत फिफ्टी अन् १९ चेंडूंत ९६ धावा; वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात वाचला

FDAच्या अधिकाऱ्यांनी केला कोट्यवधींचा घोटाळा, ५ जणांवर निलंबनाची कारवाई; मंत्री झिरवाळांनी दिली माहिती

Navratri Day 7: नवरात्रीच्या सातव्या दिवशी अशी करा माता कालरात्रीची पूजा! जाणून घ्या मंत्र, नैवेद्य, देवीचे स्वरूप अन् महत्व...

Latest Marathi News Live Update : यल्लम्मा देवीचे दर्शन घेऊन परतताना हसन मुश्रीफ यांचे वाहन शेतकऱ्यांनी अडवले, गोकाकजवळील घटना

SCROLL FOR NEXT