contribute to the beautification or disfigurement of mumbai city poster advertisement Sakal
मुंबई

Mumbai News : ही कमान का हटेना? शहरातील सौंदर्यीकरण की विद्रुपीकरणास हातभार

दहिहंडी पासून दिवाळी पर्यंत सण उत्सव सरले...शहरातील विद्रुपीकरणास हातभार लावणाऱ्या कमानी, पोस्टर हटले आहेत.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - दहिहंडी पासून दिवाळी पर्यंत सण उत्सव सरले...शहरातील विद्रुपीकरणास हातभार लावणाऱ्या कमानी, पोस्टर हटले आहेत. मात्र डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौकातील कमान मात्र अद्याप हटलेली नाही. शिवसेना शिंदे गटाकडून ही कमान लावण्यात आली असून दिवाळीच्या शुभेच्छा सध्या त्यावर झळकताना दिसतात.

इतर कमानी हटल्या ही कमान का हटेना ? असा सवाल जागरुक नागरिक करत आहेत. या कमानी पासून हाकेच्या अंतरावर केडीएमसीचे विभागीय कार्यालय असून पालिका प्रशासनाचे याकडे अद्याप लक्ष गेले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सण उत्सवांच्या दरम्यान राजकीय पक्षांकडून शुभेच्छा देणारे बॅनर, पोस्टर, कमानी या मोठ्या प्रमाणात शहरात झळकतात. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी क्षेत्रात तर या कमानी आणि बॅनर्सला जणू उतच आला होता.

दहिहंडी उत्सव पासूनच शहरात कमानी लागण्यास सुरुवात होते. ते दसरा दिवाळी पर्यंत या कमानी कायम राहतात. त्यावरील शुभेच्छांचे फलक केवळ बदलत असतात. मोठ मोठ्या कमानींमुळे शहरात वाहतूकीला अडथळा निर्माण होऊन कोंंडी होत असते.

कल्याण मध्ये एका कमानीमुळे गणपती विसर्जनात अडथळा निर्माण झाला होता. अवजड वाहनांना याचा अडथळा निर्माण होतो. याविषयी दरवर्षी नागरिकांकडून ओरड होत असली तरी पालिका प्रशासन व राजकीय पदाधिकारी यांना त्याचे काहीही पडलेले नसते.

केवळ आपल्या नेत्यांचे मोठ मोठे फोटो झळकवून त्यांना खुश करण्याकडेच या पदाधिकाऱ्यांचा कल दिसून येतो. दिवाळी आता सरली असून तुळशीची लग्नसराई देखील झाली. दसरा, दिवाळी नंतर शहरातील सर्व कमानी या हटल्याचे दिसून येत असले तरी डोंबिवली पूर्वेतील एक कमान मात्र जशीच्या तशी उभी आहे. दिवाळी सरली तरी ही कमान का हटत नाही ? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

पूर्वेतील इंदिरा चौकात शिवसेनेची मध्यवर्ती शाखा असून या ठिकाणी शिंदे गटाच्या वतीने कमान उभारण्यात आली आहे. शहरातील इतर कमानी हटल्या मात्र ही कमान हटविण्यात आलेली नाही. या इंदिरा चौकाच्या जवळच हाकेच्या अंतरावर केडीएमसीचे डोंबिवली विभागीय कार्यालय आहे.

मात्र तरीही पालिका अधिकाऱ्यांचे या गोष्टीकडे लक्ष जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. इंदिरा चौक हा कायम वाहन कोंडीचे केंद्र बिंदू राहीला आहे. स्टेशन परिसर असल्याने मार्केट, रेल्वे स्थानक परिसरात जाण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे.

पूर्वेतून पश्चिमेकडे जाण्यासाठी कोपर पूलावरुन जाणारी वाहने या मार्गावरुन जात असतात. शिवाय येथे मोठ्या प्रमाणात रिक्षा थांबे, टॅक्सी थांबे आहेत. जवळच केडीएमटी चा बसथांबा आहे. काही खासगी बस देखील इंदिरा चौकात थांबत असतात.

त्यामुळे सकाळ संध्याकाळ हा परिसर कोंडीचे मुख्य बिंदू होतो. असे असताना वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या या कमानीकडे मात्र कोणी लक्ष देत नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. प्रभाग अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात येत नसली तरी केडीएमसीच्या नवनियुक्त आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड याकडे लक्ष देणार का ? हे आता पहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhayandar: मुंबईत मराठी माणसाला घर देण्यास नकार, महिलेचा आरोप; प्रताप सरनाईकांचा संताप

Crime: कर्जत-खोपोली मार्गावर अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला; हत्या की घातपात?

Latest Marathi Update Live: नीट पेपरफुटी प्रकरणी मनिषा मांढरेची न्यायालयीन कोठडीत रवानगी, तर हवालदारला सीबीआय कोठडी

खेकडेच राहणार तुम्ही... रितेश देशमुखच्या त्या व्हिडीओवरून नेटकऱ्यांमध्येच जुंपली; चाहत्यांनी ट्रोलर्सना सुनावलं; नेमकं प्रकरण काय?

Kolhapur Rice Theft : गोदामातून तांदळाची 72 पोती चोरणाऱ्या तीन महिलांना अटक; मध्यरात्री टेम्पो बोलावून नेली पोती

SCROLL FOR NEXT