Dharavi Masjid ESakal
मुंबई

Dharavi: विरोध, गोंधळ अन् कारवाई; अखेर धारावीतील 'त्या' मशिदीचा वादग्रस्त भाग समितीच्या लोकांनी पाडला

Dharavi Masjid Case Latest Mumbai News Updates: धारावीतील मशीदीच्या एक भाग वादात अडकला होता. यानंतर आता तो भाग समितीच्या लोकांनी पाडला आहे.

Vrushal Karmarkar

Mumbai News Updates in Marathi: मुंबईतील धारावी झोपडपट्टीत बांधण्यात आलेल्या मेहबूब-ए-सुभानिया मशिदीचा वादग्रस्त भाग पाडण्यात आला आहे. मस्जिद समितीचे लोकच हा भाग पाडत आहेत. गेल्या शनिवारी याबाबत गदारोळ झाला होता. तोडण्याची कारवाई करण्यासाठी आलेल्या बीएमसीच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना सरकारी कामात अडथळा आणणे, दंगा करणे आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी अटक केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, 21 सप्टेंबरला धारावीच्या मेहबूब-ए-सुभानिया मशिदीवर गोंधळ झाला होता. त्यानंतर मशीद समितीने सात दिवसांचा अवधी मागितला होता आणि बेकायदा भाग स्वतः पाडण्याचे आश्वासन दिले होते. तो बेकायदेशीर भाग सोमवारी पहाटे मशीद समितीनेच पाडला आहे. मशिदीच्या वरच्या मिनारचा 20 फूट भाग आहे, जो प्रामुख्याने बेकायदेशीर आहे. त्यावर हिरवा पडदा लावण्यात आला आहे. त्यावर लाकूड बसवून मशीद कमिटी ते पाडत आहे.

शनिवार 21 सप्टेंबर रोजी मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी बीएमसीची टीम पोलीस दलासह दाखल झाली तेव्हा सुभानिया मशिदीबाबत गोंधळ झाला. स्थानिक लोकांनी याला विरोध करत ही मशीद 25 वर्षे जुनी असल्याचे सांगितले होते. मुस्लीम समाजाच्या लोकांनी सांगितले की, ज्या वेळी मशीद बांधली गेली, त्यावेळी समाजातील लोकांची संख्या कमी होती. लोकसंख्या वाढली आणि पूजा करणाऱ्यांची संख्या वाढल्याने मशिदीचा दुसरा मजला बांधण्यात आला.

मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी बीएमसीचे पथक आले असता, सोसायटीतील लोकांनी याला विरोध करत गोंधळ घातला. जेव्हा परिस्थिती तणावपूर्ण बनली तेव्हा मशीद व्यवस्थापनाशी संबंधित लोकांनी बीएमसीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली, त्यांनी अतिक्रमण काढण्यासाठी चार ते पाच दिवसांचा वेळ मागितला, ज्याला अधिकाऱ्यांनी सहमती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaheen Shaheed Arrest : दिल्ली बॉम्बस्फोटाबाबत नवीन खुलासा; मसूद अझहरच्या बहिणीच्या संपर्कात होती ‘शाहीन’

बिग बॉस स्पर्धकांच्या गळ्यात २४ तास असणाऱ्या माइकची किंमत किती? चुकून बोलून गेला सलमान पण प्रेक्षक चक्रावले

Police Action: कायद्याचे उल्लंघन केल्यास फौजदारी! निवडणूक काळात शांतता राखण्याचे पोलिसांचे निर्देश

Shegaon Alert : दिल्ली हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शेगावच्या श्री संस्थानमध्ये सुरक्षा वाढवली!

Navi Mumbai News: नवी मुंबईत वाहतुकीत बदल! 'या' भागात नो पार्किंग; नवे नियम लागू

SCROLL FOR NEXT