मुंबई

राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षांचे वादग्रस्त वक्तव्य; ठाणे लोकसभेचा आघाडीचा उमेदवार निष्ठावान आणि "चारित्र्यहीन"

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या वतीने मळावे, बैठका घेण्याचा सपाटा सुरु आहे.

सकाळ वृत्तसेवा

Thane News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या वतीने मळावे, बैठका घेण्याचा सपाटा सुरु आहे. त्यात महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी विभागीय मेळावा नुकताच पार पडला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी पक्षाने आपाल्यावर सोपवलेली जबाबदारी,

उमेदवाराला निवडणू आणण्यासाठी प्रयत्न करण्यार असल्याचे सांगत, ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजन विचारे हे निष्ठावंत आणि चारित्र्यवान म्हण्याऐवजी चारित्र्यहीन असा उल्लेख त्यांच्या भाषणातून केला. यावेळी उपस्थितांनी त्यांची हि चूक लक्षात आणून दिली. मात्र, त्यांचा त्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते आता, चांगलेच त्रोल होताना दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून राजन विचारे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर, अद्यापही महायुतीला या जागेसाठी उमेदवारच मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

असे असले तरी, दोन्ही बाजूनी प्रचाराच्या अनुषंगाने बैठका व मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार महाविकास आघाडीचा मंगळवारी बाळकुम येथे विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे,

काँग्रेस ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आदी उपस्थित होते. मात्र यावेळी उमेदवार विचारे हे उपस्थित नव्हते. याप्रसंगी बोलताना, देसाई यांनी बोलताना, मी उमेदवार राजन विचारे आणि इंडिया आघाडीचा प्रचार करत आहे. माझ्या शरदचंद्र पवार यांनी माझ्या खांद्यावर जबाबदारी दिली.

तसेच माझ्या आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निष्ठेने मला ही जबाबदारी दिली आहे. तसेच इंडिया आघाडीने जो नेता उमेदवार म्हणून दिला आहे. तो निष्ठावान आणि चारित्र्यहीन असे वादग्रस्त विधान त्यांनी आपल्या भाषणाच्यावेळी काढले.

याचदरम्यान उपस्थित शिवसैनिकांनी चारित्र्यहीन नाहीतर चारित्र्यवान असे म्हणून देसाईंना त्यांची चूक तात्काळ दाखवून दिली. मात्र तो व्हिडीओ व्हायरल झाल्यावर सुहास देसाई हे चांगलेच ट्रोल होवू लागले आहे. तर, त्यांना नेमके म्हणायचे काय होते, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उड्डाण घेतलं अन् थेट जमिनीवर कोसळलं; हेलिकॉप्टरचा अपघात; सहा जणांचा मृत्यू, कुठं घडली घटना?

Rajnath Singh Statement: धाकड' CM आता बनले 'धुरंधर'! २०२७ मध्ये लगावणार विजयाचा 'सिक्सर'; राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी

सोशल मीडियाचा निष्पक्ष न्यायप्रक्रियेला धोका; सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण; व्यक्त केली गंभीर चिंता, काय म्हणाले?

Mumbai Indians: इस बार NO. 6... ! हिटमॅनच्या हातात माईक अन् हार्दिक-सूर्यासह फुंकले IPL 2026 साठी रणशिंग; Video Viral

Pune Crime: चाेरट्यांचा तब्बल २८ तोळे सोन्यावर डल्ला; आंबेगाव तालुक्यातील घटना, घरात काेणी नसल्याने साधला डाव!

SCROLL FOR NEXT