मुंबई

संजय राऊत यांच्या 'त्या' वक्तव्यारून वाद; आयएमएची दिलगीरी व्यक्त करण्याची मागणी

भाग्यश्री भुवड


मुंबई : शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात डॉक्टरांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे.  इंडीयन मेडीकल असोसिएशन, महाराष्ट्रने राऊत यांच्या या वक्तव्याचा निषेध केला असून दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी केली आहे.

वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना मुंबईतील साथीच्या रोगाची परिस्थिती हाताळण्याचा अऩुभव असल्याचे सांगितले होते. त्यापुढे त्यांनी आपण कधीही डॉक्टरांकडून औषध घेत नाही. कंपाऊंडरकडून औषध घेतो, त्यांना जास्त अनुभव असतो, असे वक्तव्य केले होते.  इंडीयन मेडीकल असोसिएशन महाराष्ट्रने आज झालेल्या मासिक बैठकीत या वक्तव्याच्या निषेधाचा ठराव मंजूर केला. राज्यावर कोरोनाचे गंभीर संकट ओढवले असताना डॉक्टरांच्या विरोधात केलेले हे वक्तव्य दुदैवी असल्याचे, आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ अविनाश भोंडवे यांनी म्हटले आहे. राऊत यांनी हे आपले वक्तव्य ताबाडतोब मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. संजय राऊत यांच्या निषेधाचे पत्र तसेच, आजच्या ठरावाचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री तसेच राज्यपालांना देण्यात येणार आहे. शिवाय पंतप्रधान, केंद्रीय आरोग्यमंत्री तसेच उपराष्ट्रपती यांना देखील निषेधाचे पत्र देण्यात येणार असल्याचे डॉ. भोंडवे यांनी  सांगितले.

कोरोना काळात प्राणाची बाजी लाऊन डॉक्टर रूग्ण सेवा करत आहेत. अनेक डॉक्टरांना आपले प्राण गमवावे लागले. अशात संजय राऊत यांनी डॉक्टरांवर असभ्य टिप्पणी कऱणे हे दुर्दैवी आहे. सरकारमधील एका जबाबादार लोकप्रतिनिधीने असे वक्तव्य केल्यामुळे डाॅक्टरांमध्ये तीव्र नाराजी असून त्यामुळे त्यांचे खच्चीकरणही होत आहे. 
- डाॅ. अविनाश भोंडवे,
अध्यक्ष, आयएमए, महाराष्ट्र

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel - Iran War युद्धाचा भडका! इस्रायलचा इराणवर हल्ला, देशात आणीबाणी लागू; एअरस्पेस बंद, सर्व शाळांना सुट्टी

चेंबूरमध्ये भीषण दुर्घटना! बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ८व्या मजल्यावरून कोसळले ६ मजूर

Mumbai Goa Highway Delay : कोकणवासीयांचा संताप! मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात दिरंगाई; बड्या ठेकेदारांना ठोठावला तब्बल 16 कोटींचा दंड

Latest Marathi News Live Update : चेंबूरमध्ये धक्कादायक घटना, इमारतीच्या 8 व्या मजल्यावरून पडले 6 कामगार

PG Portal : सरकारी ऑफिसमध्ये फेऱ्या मारून वैतागलाय? घरबसल्या 'इथे' करा कोणत्याही विभागाची तक्रार; थेट पंतप्रधान कार्यालयात पोहोचेल तुमचं म्हणणं

SCROLL FOR NEXT