Tanushree Datta and Nana Patekar
Tanushree Datta and Nana Patekar 
मुंबई

#MeToo : नानांना क्लीन चीट; तनुश्री भडकली

वृत्तसंस्था

मुंबई : अभिनेता नाना पाटेकर यांना आज मुंबई पोलिसांनी चांगलाच दिलासा दिला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी दाखल केलेल्या विनयभंगच्या तक्रारीमधून पाटेकर यांना पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे.

अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या 'बी समरी' अहवालात ओशिवारा पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, नाना यांच्या विरोधात आरोप पत्र दाखल करण्याएवढे पुरावे नाही. याबाबत दत्ता यांच्या वकिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणाबाबतीत पोलिसांनी तक्रादाराला काहीही सांगितले नाही. त्यामुळे याविरोधात उच्च न्यायालयात याचिका करू असे ऍड नितीन सातपुते म्हणाले.

अन् तनुश्री भडकली

नाना पाटेकर यांना क्लीन चीट मिळताच तनुश्री चांगलीच भडकली. ''भ्रष्टाचारी पोलिसांची भ्रष्टाचारी नानाला मदत'' अशी प्रतिक्रिया तिने यावेळी दिली. 

ऑक्टोबर 2018 मध्ये दत्ता यांनी पाटेकर यांच्या विरोधात तक्रार केली आहे. सन 2008 मध्ये हॉर्न ओके प्लिज या सिनेमाच्या शुटींग दरम्यान पाटेकर यांनी गैरवर्तन केले. तसेच तिला मारहाण केली होती, असा आरोप तनुश्री दत्ताने केला होता.

10 वर्षांपूर्वी नाना पाटेकर यांच्याबद्दल सर्वांना माहिती होती. त्यांचे बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रीशी वाद झाले आहेत. नाना यांचे स्त्रियांशी अपमानास्पद वर्तन राहिले आहे. मात्र, याबद्दल त्यावेळी कोणीही चर्चा केली नव्हती. गेल्या आठ वर्षात अक्षय कुमार, रजनीकांत यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांनी नाना पाटेकर यांच्यासोबत काम केले आहे. जर हे मोठे अभिनेते अशा अपराधी अभिनेत्यांसोबत काम करत राहिले, तर बॉलीवूडमध्ये सुरू झालेल्या मी टू सारख्या चळवळीला काही अर्थ राहणार नाही, , असे तनुश्री दत्ताने म्हटले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT