CBI sakal media
मुंबई

Corona blast in CBI : मुंबई कार्यालयातील २३५ पैकी ६८ जणांना लागण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईत (mumbai) कोरोना विषाणूचा (coronavirus) कहर सुरूच आहे. सीबीआयच्या मुंबई कार्यालयात शनिवारी कोरोनाचा स्फोट (Corona blast in CBI) झाला. एकूण ६८ कार्यालयीन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह (68 person positive) आढळले आहेत. सीबीआयचे कार्यालय मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आहे.

केंद्रीय एजन्सीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, कार्यालयात काम करणाऱ्या २३५ लोकांना चाचणी करण्यास सांगितले होते. २३५ पैकी ६८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (68 person positive) आला आहे. कोरोनाबाधितांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. मुंबईत कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.

शुक्रवारी महाराष्ट्रात ४०,९२५ लोकांची कोरोना विषाणूची प्रकरणे समोर आली आहेत. नवीन प्रकरणे समोर आल्याने राज्यात आतापर्यंत एकूण ६८,३४,२२२ लोकांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. तर एकूण १,४१,६१४ लोकांचा या साथीमुळे मृत्यू झाला आहे.

४०९ बाधित पोलिसांवर उपचार सुरू

शुक्रवारी एकाच दिवसात मुंबई पोलिसांच्या किमान ९३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची (coronavirus) लागण झाल्याचे आढळून आले होते. यामुळे मुंबई पोलिस विभागातील संक्रमितांची संख्या ९,६५७ वर पोहोचली आहे. तसेच १२३ जवानांनी जीव गमावला आहे. सध्या ४०९ बाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Kardile : भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन, ६६ व्या वर्षी घेतला अंतिम श्वास

Manoj Jarange: बीडमध्ये होणारा ओबीसी मेळावा राष्ट्रवादी पुरस्कृत; मनोज जरांगे यांची टीका, राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींचा ऑक्टोबरचा हप्ता कधी जमा होणार? भाऊबीजेची ओवाळणी मिळणार?

Pro Kabaddi 2025: पराभवाची व्याजासह परतफेड! यू मुंबाचा तेलुगू टायटन्सवर दणदणीत विजय

Latest Marathi News Live Update : भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डीले यांचं निधन, वयाच्या ६६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT