BMC sakal media
मुंबई

बंद घरांवर महापालिकेची नजर ; २२ हजार घरांतील १ लाख नागरिकांची तपासणी

भाग्यश्री भुवड

मुंबई : कोरोनाची तिसरी लाट (corona third wave) आणि डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण (delta plus variant patient) वाढत असल्याने पालिका प्रशासन (bmc) सज्ज झाले आहे. त्याअंतर्गत आता पालिका अशा घरांची तपासणी (closed house checking) करणार आहे जी घरे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान बंद होती. या घरांच्या तपासणीदरम्यान घरात राहणाऱ्या नागरिकांची पालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी (health department) चौकशी करुन कोरोना स्क्रीनिंग (corona screening) करतील. या बंद घरांची यादी पालिकेच्या प्रत्येक वाॅर्डच्या आरोग्य केंद्रांकडे सुपूर्द केली गेली आहे.

गेल्या वर्षी कोरोनाने थैमान घातल्यामुळे  अनेक स्थलांतरित मजूर मुंबईहून त्यांच्या गावी गेले होते.  यानंतर, अनेक मजूर निर्बंधांमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर घरी परतले. अशीच परिस्थिती कोरोनाच्या  दुसऱ्या लाटेच्या वेळी दिसून आली. या दोन्ही लाटेच्या वेळी, पालिका आरोग्य विभागाने प्रत्येक प्रभागात स्क्रीनिंग मोहीम सुरू केली होती. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, दोन्ही लाटांमध्ये झोपडपट्टी भागात हजारो घरे बंद असल्याचे आढळले होते. त्यामुळे आता स्थानिक वॉर्डातील आरोग्य कर्मचारी पुन्हा यापूर्वी बंद असलेल्या आणि आता दरवाजे उघडलेल्या घरातील नागरिकांची तपासणी करणार आहेत.

22 हजार घरे होती बंद

पालिकेने 24 वॉर्डमध्ये लोकांची आरोग्य तपासणी सुरू केली होती.  या तपासणी दरम्यान अनेक घरे बंद असल्याचे आढळून आले.  काकाणी यांच्या म्हणण्यानुसार, संभाव्य तिसरी लाट पाहता बंद घरांची पुन्हा तपासणी केली जाईल. यात एक लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी होणार आहे. ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसली तर संबंधितांची कोरोना तपासणी केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT