Corona Update sakal media
मुंबई

मुंबईत कोरोना रुग्णांसह मृत्यूही नियंत्रणात

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत आज 500 च्या आत नवीन रुग्ण (Corona New Patient) सापडले असून मृतांची संख्या 10 पर्यंत खाली आली आहे. मुंबईत आज 489 नवीन रुग्ण सापडले. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची (Corona patient number) एकूण संख्या 7,25,167इतकी झाली आहे. आज 645 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आत्तापर्यंत 6,99,341 रुग्ण (Corona free Patient) कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत 73,23,183 कोरोना चाचण्या (Corona Test) करण्यात आल्या आहेत. (Corona cases and death decreasing day to day situation in Mumbai)

मुंबईत आज दिवसभरात 10 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मुंबईतील मृतांचा आकडा 15 हजार 554 इतका झाला आहे. आज मृत झालेल्यांपैकी 7 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 7 पुरुष तर 3 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 5 रुग्णाचे वय 40 ते 60 वयोगटातील होते तर 5 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते. कोरोना रुग्णवाढीचा सरासरी दर 0.8 % इतका आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 802 दिवसांवर गेला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 % आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 7,947 हजारांवर आला आहे.

मुंबईत 13 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 65 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 2,465 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये  अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल 825 करण्यात आले.  धारावीमध्ये आज 3 नवीन रुग्ण आढळले.  धारावीतील एकूण रुग्णसंख्या  6903 इतकी आहे. माहीम मध्ये आज 8 नवे रुग्ण सापडले असून माहीम मधील एकूण रुग्ण 10,029 झाले आहेत. दादर मध्ये 3 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांचा आकडा 9701 वर पोचला आहे. जी उत्तर मध्ये आज 13 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांचा आकडा 26,633 झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT