corona vaccination sakal media
मुंबई

शिवसेनेतर्फे 'लसीकरणाची दहीहंडी' ; 35 हजार नागरिकांसाठी शिबिरे

कृष्ण जोशी

मुंबई : कोरोनाचा (corona) फैलाव होण्याची शक्यता लक्षात घेता सावधगिरीचा (precautions) उपाय म्हणून शिवसेनेतर्फे (shivsena) मुंबईत (mumbai) होणाऱ्या मानाच्या दहीहंड्या (dahihandi) रद्द करण्यात आल्या असून त्याऐवजी आमदार प्रकाश सुर्वे (prakash surve) आणि विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी किमान 35 हजार नागरिकांसाठी महालसीकरण शिबिरे (corona vaccination) आयोजित केली आहेत.

सुर्वे आणि सकपाळ यांच्यातर्फे दरवर्षी मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. मागाठाण्याचे आमदार असलेले सुर्वे यांच्या तारामती चॅरिटेबल ट्रस्टतर्फे 15 ते 25 लाख रुपये बक्षिसाची नऊ थरांची दहीहंडी आयोजित केली जाते. ही फोडण्यासाठी किमान सव्वा चारशे-पाचशे मंडळे येथे हजेरी लावतात. मात्र सुर्वे यांनी सध्याची परिस्थिती लक्षात घेता हा उत्सव रद्द केला असून त्याऐवजी त्यांनी आरोग्य सेवादिन किंवा लसीकरण दिवस आयोजित केला आहे. यात रिलायन्स फाउंडेशनच्या सहकार्याने सहा हजार नागरिकांना निशुल्क लसी देण्यात येतील असे सुर्वे यांनी सकाळ ला सांगितले.

सकपाळ यांचाही उत्सव रद्द

शिवसेनेच्या दक्षिण मुंबई विभाग क्रमांक बारा चे प्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्यातर्फेही गेली दहा वर्षे मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव, शोभायात्रा यांचे आयोजन केले जाते. या उत्सवात इमामवाडा, फणसवाडी, उमरखाडी, मांडवी कोळीवाडा, चिंचबंदर, क्रांती नगर येथील मंडळांचे ट्रकवर सजवलेले देखाव्यांचे चित्ररथ सहभागी होतात. येथेही सात-आठ थरांच्या दहीहंडीला साडेचार लाख रुपयांची बक्षिसे दिली जातात. या उत्सवात दीडशे मंडळ सहभागी होतात.

मात्र यावेळी त्यांच्यातर्फेही मोठी लसीकरण शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. यात रिलायन्स फाउंडेशन तर्फे सुमारे 14 हजार कोव्हॅक्सीन चे डोस तर जसलोक रुग्णालयातर्फे साडेसात हजार कोव्हीशील्ड लसीचे डोस दिले जातील. त्यानंतर कामाठीपुरा व फोर्ट येथेही चार हजार कोव्हीशील्ड लशींचे डोस दिले जातील, असे सकपाळ यांनी सकाळला सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Candidate: नवनीत राणा, छगन भुजबळ चर्चेत; पण राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा वेगळाच मास्टरस्ट्रोक! अखेर नाव जाहीर, कुणाला दिली संधी?

Raigad Traffic: पालीकरांना मोठा दिलासा! शहरात अवजड वाहतुकीला सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय..

World Yogasana Championships: भारताचे निर्विवाद वर्चस्व! तब्बल २२ सुवर्णपदकांसह यजमान संघाचे अव्वल स्थान कायम

Video: Shreyas Iyer ची भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला, 'ही भावना खूपच...'

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT