मुंबई

कोरोनाबाधितांचे मृतदेह दफन करण्यावर काय म्हणतंय मुंबई उच्च न्यायालय, वाचा..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महापालिकेने जारी केलेल्या नव्या परिपत्रकानुसार अल्पसंख्याक समाजातील कोरोनाबाधित मृतांचे दफन करण्यावर बंदी नसल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होते, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले. या परिपत्रकात हस्तक्षेप करण्यासही न्यायालयाने बुधवारी नकार दिला. 

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महापालिकेने 30 मार्चला परिपत्रक प्रसिद्ध केले होते. कोरोनाबाधितांच्या मृतदेहांचे सरसकट दहन करावे. त्यामुळे अधिक संसर्ग होणार नाही. दफन करावयचे असल्यास शहराबाहेर व्यवस्था करावी, असे या परिपत्रकात म्हटले होते. त्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्यानंतर महापालिकेने हे परिपत्रक मागे घेऊन नवीन परिपत्रक प्रसिद्ध केले. मुंबईत कोरोनाबाधितांच्या मृतदेहांचे दफन करण्यास परवानगी आहे. मोठ्या दफनभूमीतच अंत्यसंस्कार करावेत. कोरोनाचा संसर्ग परिसरात पसरू नये म्हणून ही खबरदारी घ्यावी, असे महापालिकेने नव्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे. 

या परिपत्रकाला रियाझ खान यांनी याचिकेद्वारे आव्हान दिले होते. महापालिका मृतदेहांचे दफन करण्यास परवानगी देत नसून, दहन करण्यास सांगत असल्याचा दावा त्यांनी केला होता. न्या. ए. ए. सय्यद यांनी हा दावा अमान्य केला आणि नव्या परिपत्रकात तसे म्हटल्याचे आढळत नाही, असे स्पष्ट केले. उच्च न्यायालयाने याचिकादाराच्या दाव्यात तथ्य नसल्याचे सांगत हस्तक्षेप करण्यास नकार दिला. या याचिकेवर पुढील सुनावणी 24 एप्रिलला होणार आहे.

Corona dead body is not banned for burial: High Court

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गंगोत्री-गोमुख ट्रेकवेळी भूस्खलन, महाराष्ट्रातील व्यापाऱ्याचा दरीत पडून बेपत्ता

Pakistan Terrorism : दहशतवादाच्या विळख्यात पाकिस्तान; ग्लोबल टेररिझम इंडेक्समध्ये अव्वल

'मराठीत बोल नाहीतर यूपीला परत जा', मुंबई लोकलमध्ये भाषेवरून महिला प्रवाशांमध्ये वाद पेटला; Video Viral

SA vs AUS 2nd ODI: कूपर कॉनोलीची 'Stunning Catch'! एडन मार्करमचा सुरेख फटका अन् ऑसीची परफेक्ट टायमिंग Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT