fish market sakal media
मुंबई

मासळी आली, पण... ; वसई-पाचूबंदर येथील मत्स्यविक्रेते हवालदिल

संदीप पंडित

विरार : मागील दीड वर्षांतील कोरोनास्थिती (corona), डिझेलसह मासेमारी साहित्याचे वाढलेले भाव आणि पडलेले मासळीचे दर (fish rate collapse) अशा नाना समस्यांचा सामना करत वसईतील मच्छीमार (vasai fish traders) मासेमारीकरता समुद्रात उतरला खरा; पण श्रावण महिन्यातील उपवासांमुळे पुन्हा एकदा ग्राहक नसल्याने (no custmors) या मच्छीमारांसमोर संकट उभे राहिले आहे.गेल्या तीन वर्षा पासून मच्छीमाराना कधी वादळ, कधी अतिवृष्टी (heavy rainfall) तर कधी कोरोना यामुळे त्याच्यावर उपासमारीची (finance problem) पाळी आली आहे

जवळपास दोन महिन्याच्या मासेमारी बंदी कालावधीनंतर 1 ऑगस्टपासून मासेमारी हंगाम सुरू झाला आहे. यंदा 3 ते 5 ऑगस्टदरम्यान समुद्रात वादळी वाऱ्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवून मासेमारीकरता समुद्रात जाऊ नये, असा सतर्कतेचा इशारा दिला होता. त्यामुळे 6 ऑगस्टनंतरच मच्छीमारांना मासेमारीसाठी जाण्याचे मत्स्यव्यवसाय विभागाने सूचित केले होते.त्यानुसार पालघर जिल्ह्यातील 60 टक्के बोटी 6 ते 7 ऑगस्ट रोजी खोल समुद्रात गेल्या होत्या. यात वसईतील बोटी मोठ्या प्रमाणात होत्या.

पैकी काही बोटी लवकर किनारी परतल्या असल्या तरी मासेमारीच्या आरंभी कमी मासे मिळाल्याचे सांगितले जात आहे.वसईतील मच्छीमारांकडून आणल्या गेलेल्या मासळीचा लिलाव पाचूबंदर येथील मच्छीमार सोसायटीकडून दर मंगळवारी रात्री आयोजित करण्यात येतो; या लिलावात मुंबई, ठाणे, नाशिक आणि अन्य ठिकाणाहून व्यापारी बोलीकरता सहभागी होतात; मात्र सोमवारपासून श्रावण सुरु झाल्याने या बाज़ाराकडे व्यापाऱ्यांसह ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे मच्छीविक्रेते ब्लेस माठक यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 25 ते 30 रुपयांनी डिझेल दरवाढ झाली आहे. खलाशांचे पगार वाढल्याने 10-12 दिवसांच्या मासेमारी फेरीसाठी 35 ते 40 हजार रुपयांचा खर्च वाढला आहे. अशा परिस्थितीत 350 ते 500 ग्राम वजनाच्या पापलेट माशांची आवक अपेक्षित असताना परतलेल्या बोटीना 200 ते 300 ग्राम वजनाचे लहान आकाराचे पापलेट लागत आहेत त्यात एक्पोर्टर्सनी पापलेटचा भाव आधीच कमी करून ठेवला आहे. त्यामुळे किलोमागे 250 ते 300 रुपयांचा फ़टका मत्स्य विक्रेत्यांना सहन करावा लागत असल्याचे पाचूबंदर येथील सांतान सोदीया यांनी सांगितले,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजेला सुरुवात

मोदी सरकारचा एक निर्णय, 2 पालखी मार्गांसाठी मिळाले 12 हजार 41 कोटी! 365 किमी मार्गांमुळे पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन सुलभ; पालखी मार्गांची वैशिष्ट्ये काय? वाचा...

Sonam Wangchuk: सोनम वांगचुकांनी उपोषण का सोडलं? नवीन व्हिडिओतून थेट कारणच सांगितलं; म्हणाले- अशा देशावर धिक्कार...

SCROLL FOR NEXT