मुंबई

धक्कादायक ! उपचारांनंतरही फुफ्फुसांमध्ये लपून राहतो कोरोना? काय सांगतायत वैज्ञानिक?

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग संकटात सापडलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. मात्र यशस्वी उपचारांनंतर कोरोनातून बरं होणाऱ्या लोकांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र कोरोनाग्रस्तांच्या उपचारांनंतरही त्यांच्या फुफ्फुसांमध्ये कोरोनाचे विषाणू लपून राहतात असा धक्कादायक दावा काही वैद्यानिकांनी केला आहे.

चीनच्या कोरोना रिगनच्या केस स्टडीजचा अभ्यास केल्यानंतर कोरोनाच्या काही रुग्णांना उपचारांच्या तब्बल दोन ते अडीच महिन्यांनंतरही कोरोनाची परत लागण झाली. चीन, दक्षिण कोरिया, तैवान आणि  व्हिएतनाम या देशांमध्ये देखील असे रुग्ण आढळून आले. आहेत. या रुग्णांचे रिपोर्ट उचारानंतरही पॉझिटिव्ह आले. त्यामुळे उपचारानंतरही कोरोना व्हायरस रुग्णाच्या फुफ्फुसात लपून राहू शकतो. तपासणी दरम्यान रुग्णांच्या फुफ्फुसाची तपासणी केली जात नाही त्यामुळे हे कळू शकत नाही. मात्र काही महिन्यांनंतर या रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण होते आणि हे व्हायरस परत सक्रिय होतात, असं चीनच्या काही वैज्ञानिकांचा म्हणणं आहे.   

यामुळे एका महिलेचा मृत्यू:

चीनमध्ये एका ७८ वाटशांच्या महिलेची कोरोनाची ३ वेळा चाचणी करण्यात आली होती मात्र या तिन्ही चाचण्यांमध्ये तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र काही दिवसातच ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आहे असं लक्षात आलं होतं. तिला रुग्णालयात दाखल केल्याच्या काही दिवसातच तिचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाला असं चीनच्या आर्मी मेडिकल सायन्स युनिव्हर्सिटीचे संशोधन प्रमुख डॉक्टर बियान शिबू यांनी सांगितलंय.

या महिलेच्या फुफ्फुसांत आढळला कोरोना:

या महिलेच्या मृत्यूनंतर शवविच्छेदनात कोरोना व्हायरस तिच्या शरीरात इतर कोणत्याही अवयवांमध्ये आढळला नाही. मात्र या महिलेच्या फुफ्फुसांमध्ये खोलवर कोरोना विषाणूचे स्टेन डॉक्टरांना आढळून आले. त्यामुळे कोरोना फुफ्फुसांच्या आत खोलवर जाऊन बसतो यावर संशय बळावतो.

त्यामुळे आपण सर्वांनीच कोरोना विषाणूबरोबर लढण्यासाठी स्वतःला जपण्याची जास्त गरज आहे.

corona hides in lungs even after treatment what scientist have to say about this 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

SCROLL FOR NEXT