मुंबई

Corona Effect: कोविड 19 चा दुष्परिणाम, त्वचा दानात 90 टक्क्यांनी घट

भाग्यश्री भुवड

मुंबई: कोरोना विषाणूमुळे अवयवदान कमी झाल्यानंतर आता त्वचा दानातही मोठी घट झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ऐरोली नॅशनल बर्न सेंटरच्या स्किन बॅंकेत केवळ 11 टक्के त्वचा दान करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार कोरोनामुळे त्वचा दानात अशी घट दिसून आली आहे.

रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 9 महिन्यात या केंद्रात केवळ 22 त्वचा दान करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी मार्च ते नोव्हेंबर या काळात 200 त्वचा दान झाले होते. अतिशय गंभीररित्या जळालेल्या व्यक्तीच्या त्वचेचे बर्‍याच वेळा मोठे नुकसान होते. त्यामुळे, त्वचा स्वत: पुन्हा पुर्ववत होण्यास असमर्थ ठरते. 

यामध्ये संसर्ग आणि वेदना समस्या देखील उद्भवतात, त्वचेच्या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेच्या सहाय्याने रुग्णाला त्रास होण्यापासून वाचवले जाते. मात्र त्वचा दानाच्या अभावामुळे रुग्णालयातील रुग्णांना परत पाठवले जाते.

राष्ट्रीय बर्न सेंटरचे संचालक डॉ. सुनील केसवानी यांनी सांगितले की, सुरुवातीला कोरोना आजाराबद्दल कोणालाही माहिती नव्हती. म्हणूनच आम्ही त्वचा वेगळी करण्याची प्रक्रिया थांबवली होती. (मृत व्यक्तीच्या शरीरावरुन त्वचा काढून टाकण्याची प्रक्रिया). ऑगस्टमध्ये आम्ही त्वचा काढण्याचा पहिला प्रोटोकॉल बदलला आणि आता आम्ही पुन्हा सुरुवात केली आहे. मात्र अद्याप आम्हाला इतका चांगला प्रतिसाद मिळत नाही. 

महिन्यात 6 ते 7 दान

कोरोना आधी महिन्याला 22 त्वचा दान होत होते. मात्र, आता कोरोना आल्यापासून एका महिन्यात केवळ 5 ते 7 दान होत आहेत. 

इतिहास आणि स्वाब चाचणीनंतर दान

आम्ही आमचा प्रोटोकॉल बदलला आहे. आता आम्ही देणगीदारांच्या (मृत) कुटूंबाकडून फोनवर त्या दात्याचा इतिहास घेतो. आपण इतिहासात कोविड पॉझिटिव्ह होते की नाही? जास्त गंभीर होते किंवा नाही? कोणत्याही प्रकारचे रोग किंवा कोविड लक्षणे आहेत की नाही फक्त याची माहिती घेतली जाते. जर दिलेल्या माहितीवर काही प्रश्न नसेल तर दात्याची स्वाब चाचणी केली जाते आणि अहवाल निगेटिव्ह आल्यावरच त्वचा काढण्याची प्रक्रिया केली जाते. 
डॉ. सुनील केसवानी, संचालक, राष्ट्रीय बर्न सेंटर

विश्वास आणि सत्य

लोकांना असे वाटते की दात्याच्या संपूर्ण शरीराची त्वचा मृत्यूनंतर काढून टाकली जाते, जे खरं नाही. दात्याच्या पाठ, मांडी आणि पायाची त्वचा काढली जाते. त्वचा काढल्यानंतर शरीरातून रक्त काढून टाकणे हे देखील चुकीचे आहे. मृत्यूनंतर, त्या व्यक्तीचे रक्त घट्ट होते. आणि आतील कोणताही अवयव दिसत नाही. त्वचा पूर्णपणे काढून टाकली जाते.

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Corona impact Side effects of Covid 19 90 Percent reduction in skin donation

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून; नेमकं काय घडलं? मृतदेह स्वीकारण्यास पत्नीचा का नकार?

SCROLL FOR NEXT