mumbai sakal
मुंबई

रेल्वे प्रवासासोबत ओपीडी,शस्त्रक्रिया वाढल्या

कोरोना संसर्गाचा फटका सर्वसाधारण रुग्णसेवेला बसला होता

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना (Corona) संसर्गाचा फटका सर्वसाधारण रुग्णसेवेला बसला होता. कोरोना (Corona) परिस्थिती नियंत्रणात आल्याने तसेच लसवंतांना (Vaccinate) रेल्वे (Railway) प्रवासाची मुभा दिल्याने रुग्णालयांतील ओपीडीला (OPD) येणारे रुग्ण वाढले असून शस्त्रक्रियांचा आकडा वाढून 70 टक्क्यांवर गेला आहे. लसीकरणाचा (Vaccination) वेग वाढवल्यास आरोग्य सेवा पूर्वपदावर येण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करत आहेत.

करोना काळात पालिकेची बहुतांश रुग्णालये करोनाबाधितांच्या सेवेसाठी राखीव ठेवलेली होती. काही रुग्णालये इतर आजारांसाठी खुली असली तरी र्निबधामुळे आणि भीतीमुळे रुग्ण उपचारासाठी येत नव्हते; परंतु सध्या शहरातील कोविड रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे अन्य आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच नियमित शस्त्रक्रिया सुरू झाल्याने रुग्ण शस्त्रक्रियेसाठी येऊ लागले आहेत.

  • नायर रुग्णालय पूर्णपणे कोरोना समर्पित रुग्णालय म्हणून रूपांतरित केले होते.आता हळूहळू अन्य सेवा सुरू झाल्या आहेत. सध्या रुग्णालयात 50 खाटा करोना बाधितांसाठी राखीव ठेवलेल्या असून अन्य खाटा इतर आजारांसाठी खुल्या केल्या आहेत. आपत्कालीनसह अतिरिक्त शस्त्रक्रियाही सुरू झालेल्या असून दिवसाला 350 ते 400 शस्त्रक्रिया होत आहेत. तसेच बाह्य़रुग्ण विभागातही आता 60 ते 70 टक्के रुग्ण पुन्हा यायला सुरुवात झाली आहे. सध्या दीड हजारावर रुग्ण ओपीडी मध्ये दाखल होत आहेत. करोनापूर्व काळात साधारण अडीच हजार रुग्ण ओपीडी मध्ये येत होते. रेल्वे प्रवासास मंजुरी मिळाली तर ओपीडी मध्ये येणारी रुग्णसंख्या वाढेल असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

  • सायन रुग्णालय नियमितपणे सुरू झाले असून दिवसाला छोट्या मोठ्या अशा 350 शस्त्रक्रियाही होत आहेत.तर दर दिवशी 5,500 हुन अधिक रुग्ण ओपीडी मध्ये उपचारासाठी येत आहेत.सध्या कोविड व्यतिरिक्त अन्य आजारांचे रुग्ण येत असून साधारणता एक हजार रुग्णांवर उपचार होत असल्याचे लोकमान्य टिळक रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले.

  • केईएम रुग्णालयात करोनाकाळातही सेवा सुरू होत्या, मात्र दूर राहणारे रुग्ण उपचारासाठी येत नव्हते. कोविड संख्या घटलेली असल्याने सध्या रुग्णालयात फार कमी केवळ एक ते दोन टक्के करोना बाधित आहेत. इतर आजारांवरील उपचार मात्र नियमितपणे सुरू आहेत. रुग्णालयात दिवसाला जवळपास 350च्या वर शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. तर ओपीडी मध्ये सध्या दर दिवशी सुमारे पाच हजार रुग्ण येत आहेत अशी माहिती डॉ.प्रवीण बांगर यांनी दिली.

पालिकेच्या मुख्य तिन्ही रुग्णालयातील ओपीडीतील रुग्णांची संख्या वाढली आहे.शस्त्रक्रिया ही सुरू झाल्या आहेत. रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी देखील काही खाटा आरक्षित ठेवल्या आहेत. कोविड रुग्ण वाढू लागल्यास जम्बो कोविडचा वापर आधी सुरू केला जाईल. त्यानंतर मुख्य रुग्णालयांचा विचार केला जाईल.

- डॉ. रमेश भारमल, संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि पालिका मुख्य रुग्णालये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

Pimpri Raja Accident: पिंप्री राजा गणेश मिरवणुकीत बेकाबू ट्रेलर घुसला; दोघांचा मृत्यू, सात जखमी, गावावर शोककळा

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

SCROLL FOR NEXT