मुंबई

मिरा भाईंदरमध्ये 8 जणांना कोरोनाची लागण 

सकाळ वृत्तसेवा

मिरा रोड: मिरा भाईंदरमध्ये आतापर्यंत 8 जणांना करोनाची लागण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आयुक्तांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. 

पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी सांगितले की, भाईंदर (पूर्व) एस.व्ही.रोड येथील 56 वर्षीय महिलेला आणि पश्‍चिमेकडील नारायण नगर येथील 60 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. मिरा भाईंदरमध्ये 492 नागरिकांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आहे. तसेच 419 नागरिकांना घरातच अलगीकरण करण्यात आले आहे. रोज या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत 69 स्वॅब तपासण्यांमध्ये 8 रुग्ण हे पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर 34 निगेटिव्ह असून 27 जणांचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही.दरम्यान पोलिसांनी रुग्ण वास्तव्य करीत असलेल्या इमारतीकडे जाणारे रस्ते बंद केले असून पुढील आदेश येईपर्यंत कोणालाही घराबाहेर न पडण्याबाबत सांगण्यात आले आहे. 

या पार्श्‍वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आज आयुक्तांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच काही उपाययोजना सुचवल्या आहेत.

Corona infection inflicts 8 lives in Mira Bhayander

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET UG Result : अन्सर कीमध्ये ६०९, निकाल लागताच ५४० पण दोन तासांनी १६७ गुण; नीट निकालात गोंधळ, विद्यार्थीनीचे गंभीर आरोप

IND vs ENG: लॉर्ड्सवर रोहित-कोहली रचणार इतिहास! सचिन-द्रविडलाही मागे टाकत करणार '400'चा महाविक्रम

Latest Marathi News Live Update : शिक्षण, आरोग्यसेवा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याबाबत सरकार अपयशी - AICC सरचिटणीस सचिन पायलट

Beed News: भ्रष्टाचार उघड होताच रातोरात काम सुरू? बीडमध्ये नेमकं काय घडलं?

सोनम वांगचुक यांची प्रकृती कशी आहे? डॉक्टरांनी दिली अधिकृत माहिती, पत्नीचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT