मुंबई

पोलिसांनो काळजी घ्या! कोरोनामुळे 24 तासांता एवढ्या योद्ध्यांचा मृत्यू

अनिश पाटील - सकाळ वृत्तसेवा



मुंबई : कोरोनापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी पोलिस रात्रंदिवस कर्तव्य बजावित  असतानाच गेल्या 24 तासांत राज्यात तीन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.त्यामुळे कोरोनामुळे राज्यातील मृत पोलिसांचा आकडा 93 वर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत आठ हजार 232 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यात मुंबई पोलिसांचे प्रमाण सर्वाधिक आहे. कोरोनाबाधीत पोलिसांमध्ये 861 पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र पोलिस दलातील 1825 पोलिस सध्या कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यात 214 अधिकारी आणि 1611 पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्य पोलिस दलातील  आतापर्यंत राज्यातील सहा हजार 314 पोलिसांनी कोरोनावर मात केलेली आहे.  कोरोनामुळे आतापर्यत राज्यात 93 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबई, ठाणे व सातारा येथील पोलिसांचा समावेश आहे. त्यांचे वय 50 वर्षांपेक्षा अधिक होते.

कोरोनाची लागण झालेल्या पोलिसांमध्ये मुंबई पोलिसांचे प्रमाणा सर्वाधिक म्हणजे 3600 आहे. त्याच्यापाठोपाठ ठाण्यात सर्वाधीत पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.  मुंबई पोलिस दलात 24 जुलै ते 29 जुलै या कालावधीत मुंबई प्रादेशिकविभागातील परिमंडळानुसार  ‘रॅपिड अँटीजेन डिटेक्शन  टेस्ट’ची  टेस्ट केली जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत विभागीय सहाय्यक पोलिस आयुक्त यांची भूमिका ही संपर्क अधिकारी म्हणून महत्वाची राहणार आहे.

वेळापत्रकानुसार विभागातील एकापोलिस ठाण्याच्या ठिकाणी हे शिबीर आयोजित केले जाणार आहे. या शिबीरात फक्त45 ते 55वयोगटातील पोलिसांची टेस्ट केली जाणार असून त्यात कुणी पॉझिटिव्ह आढळला. तर त्याला तातडीने पालिका किंवा शासकिय रुग्णालयात उपचारासाठी किंवा क्वारनटाइंन सेंटरमध्ये हलवले जाणार आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची चाचणी करून घेण्याचे काम हे संबधित वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर सोपवण्यात आले आहे.

=========================

Edited by Tushar Sonawane

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; १० जिल्ह्यांना IMDचा रेड अलर्ट, पुढील ४८ तास अतिवृष्टीचा धोका

Commonwealth Games 2026: भल्याभल्यांना टक्कर दिली, भारताची २० वर्षांची वाघिण जगाला भिडली! कोण आहे मार्टिना देवी मैबाम? थोडक्यात हुकले पदक

Karnataka HIV student: कर्नाटकमध्ये खरंच सात हजार विद्यार्थ्यांना HIV लागण? 'एड्स प्रिव्हेंशन सोसायटी'कडून अधिकृत निवेदन जारी

Commonwealth Para Athletics: तोरणडोंगरीच्या जिल्हा परिषद शाळेतील दिलीप गावितची ग्लास्गो राष्ट्रकुल पॅरा अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्णभरारी

Ambad Vegetable Market: अंबडच्या आठवडी बाजारात पावसाने भाजीपाल्याची मोठी नासाडी; शेतकरी‑विक्रेते बेभाव विक्रीला मजबूर

SCROLL FOR NEXT