mumbai city sakal media
मुंबई

मुंबईतील हवेचा 'सफर' उत्तम दर्जाचा; गुणवत्ता निर्देशांक रिपोर्टची माहिती

भाग्यश्री भुवड

मुंबई : दुसऱ्या लाटेत (Corona second wave) लॉकडाऊनमध्ये (lockdown unlock) शिथिलता दिल्यानंतर रस्त्यांवर वाहनांची गर्दी (vehicle crowd) वाढली आहे. त्यातच सुरू झालेले कारखाने, कंपन्या (company) यामुळे वाढलेले प्रदूषण याचा सर्वात जास्त परिणाम हवेवर होतो. अशातच दिलासादायक बाब म्हणजे 'सफर' या संस्थेने संपूर्ण मुंबई (Mumbai city) शहरातील हवेचा दर्जा (air quality) उत्तम नोंदवला आहे.

यातून मुंबईतील हवेचे प्रदूषण ही कमी झाल्याचे समोर येते. अनेक भागात हवेचे प्रदूषण कमी झाले असून समाधानकारक हवेची नोंद करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी समाधानकारक तर काही ठिकाणी उत्तम हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवण्यात आला आहे. मुंबईत संपूर्ण शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक मंगळवारी सकाळपासूनच उत्तम नोंदवण्यात आला.  भांडूप, कुलाबा, मालाड, माझगांव,  बोरीवली , बीकेसी, आणि अंधेरी या परिसरांमध्ये हवा समाधानकारक नोंद करण्यात आली आहे. या सर्व परिसरांतील हवा गुणवत्ता निर्देशांक 40 ते 50 दरम्यान नोंदवण्यात आला.

वरळी, चेंबूर, अंधेरी, नवी मुंबई उत्तम

दरम्यान, वरळी, चेंबूर, अंधेरी आणि नवी मुंबईतील परिसरात उत्तम दर्जाच्या हवेची नोंद करण्यात आली आहे. संपूर्ण मुंबई शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक 50 नोंद करण्यात आला आहे.

वरळी - पीएम 2.5 उत्तम  ऐक्यूआय 028

चेंबूर - पीएम 10 उत्तम  ऐक्यूआय 047

अंधेरी - पीएम 10 उत्तम  ऐक्यूआय 039

नवी मुंबई - पीएम 10 उत्तम  ऐक्यूआय 048

त्यामुळे, मुंबईकरांनी प्रभात फेरी न करण्याचे आवाहन तज्ज्ञ मंडळी करत आहेत. शिवाय, ज्यांना अस्थमा, खोकला किंवा श्वास घेण्यास काही त्रास होत असेल तर त्यावरील उपचार लगेच घ्या असे आवाहन ही करण्यात आले आहे. सध्या मुंबईत ऊन पावसाचा खेळ अनुभवायला मिळत आहे. कडाक्याच्या ऊन्हानंतर अचानक पावसाच्या सरी पडतात. यातून मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांना सर्दी, ताप, खोकला असे आरोग्याच्या तक्रारीही जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे, कोविड आणि वातावरण बदलाच्या परिणामांतून वाचण्यासाठी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत आरोग्यतज्ज्ञ व्यक्त करतात.

मुंबई संपूर्ण शहर पीएम 10 उत्तम ऐक्यूआय 050

भांडूप - पीएम 03 समाधानकारक  ऐक्यूआय 076

कुलाबा - पीएम 10 समाधानकारक  ऐक्यूआय 076

मालाड - पीएम 2.5 समाधानकारक  ऐक्यूआय 066

माझगाव - पीएम 2.5  समाधानकारक  ऐक्यूआय 061

बोरिवली - पीएम 2.5 समाधानकारक  ऐक्यूआय 060

बीकेसी - पीएम 10 समाधानकारक  ऐक्यूआय 059

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब चालकांनो लक्ष द्या! ओला-उबर चालवायची असेल तर आधी ५ दिवसांचे प्रशिक्षण अनिवार्य; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

IND vs ZIM: "जे प्रॅक्टिसमध्ये करतो, तेच मॅचमध्येही..." वैभव सूर्यवंशी 'प्लेअर ऑफ द सीरिज' पुरस्कार जिंकल्यावर काय म्हणाला?

Police Station Fire : भायखळा पोलिस ठाण्यात अचानक आग; ऐतिहासिक इमारतीच्या पहिल्या मजल्याला आग

10 Point Action Plan for Women Safety : महिला सुरक्षेसाठी जिल्हास्तरावर 10 कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; NCW चा महत्त्वाचा निर्णय

Rahul Gandhi: 'विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचा अमित शहांना थेट सवाल; पत्र लिहून मागितले उत्तर

SCROLL FOR NEXT