Pedestrian bridge sakal media
मुंबई

मुंबई : पश्चिम रेल्वेवर नवा पूल प्रवाशांसाठी खुला

वांद्रे-खार रोड दरम्यान पादचारी पूल उभारला

कुलदीप घायवट

मुंबई : कोरोनामुळे (corona) लावण्यात आलेल्या लॉकडाऊनवर (lock down) पश्चिम रेल्वेने (western railway) मात करून पायाभूत सुविधांची (basic Facilities) वाढ करत आहे. पश्चिम रेल्वे विविध संस्थांशी समन्वय साधून सुरक्षाबाबींची उभारणी करत आहे. नुकताच वांद्रे - खार रोड (Bandra-khar road) स्थानकाच्या दरम्यान दोन नव्या पादचारी पुलांची (Pedestrian bridge) बांधणी केली आहे.

पश्चिम रेल्वेवरील वांद्रे स्थानकावर चर्चगेट दिशेकडे सर्व फलाटाना जोडणारा पादचारी पूल उभा केला आहे. फलाट 1 ते 7 ला पादचारी पूल जोडला गेल्याने सर्व फलाटावरील प्रवाशांना या पुलाचा वापर करता येणार आहे. उभारण्यात आलेला पूल 80 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद आहे. या पुलाची उभारणी करण्यासाठी 7 कोटींचा खर्च आला आहे. तर, खार रोड येथील पादचारी पूल बनविण्यासाठी 8 कोटींचा खर्च आला आहे. खार रोड येथील पूल 110 मीटर लांब आणि 6 मीटर रुंद आहे.

आर्थिक वर्षात 2021-2 या वर्षात पश्चिम रेल्वेवर पाच पादचारी पूल उभारले आहेत. यामधील वांद्रे-खार रोड दरम्यान तीन, माहीम, सांताक्रूझ येथे प्रत्येकी एक पादचारी पूल उभारले आहेत. प्रवाशांनी रेल्वे रूळ न ओलांडता पादचारी पुलाचा वापर करावा, असे आवाहन पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईकरांसाठी बीएमसीची दिवाळी भेट! ४२६ सदनिकांच्या विक्री प्रक्रियेला सुरूवात होणार? अर्ज कधी आणि कुठे करायचा?

अक्षय कुमारच्या अभिनयक्षेत्रातील गुरु असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्रीचं निधन ; ८ ७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Uttrakhand : कुंभमेळ्यासाठी हरिद्वारमध्ये निर्माण केले जाणार नवे शहर; ३२ सेक्टर, एक पोलिस स्टेशन आणि एक रुग्णालयाचा असेल समावेश

Dhule News : दिवाळीत प्रवाशांना दिलासा! धुळे एसटी विभागाचा 'मेगाप्लॅन': ७३० बसेसद्वारे विशेष वाहतूक नियोजन

PCOS and Pregnancy Diabetes: PCOS आणि गर्भधारणेतील मधुमेह होण्याच्या शक्यतेचा काय आहे संबंध? जाणून घ्या उपाययोजना

SCROLL FOR NEXT