corona sakal media
मुंबई

कोरोनाच्या चाचण्या आणि रुग्णांचे प्रमाण 'या' महिन्यात एक टक्क्यांवर

समीर सुर्वे

मुंबई : कोविडचा (corona) शिरकाव मुंबईत (Mumbai) झाल्यापासून पहिल्यांदाच ऑगस्ट महिन्यात चाचण्या (corona test) आणि आढळणारे रुग्ण (corona patient) यांचे प्रमाण 1 टक्‍क्‍यांवर आले आहे. म्हणजेच कोविडचा पॉझिटीव्हीटी (positivity rate) दर 1 टक्‍क्‍यांवर आला आहे. फेब्रुवारी महिन्यात कोविडची दुसरी (corona second wave) लाट उसळू लागलेली असताना मध्यावर पॉझिटीव्हीटी दर हा 16.14 टक्के होता.तर,मे 2020 मध्ये सर्वाधिक 27.69 टक्के होता.

11 मार्च 2020 मध्ये मुंबईत कोविडचा पहिला रुग्ण नोंदविण्यात आला.सुरवातील कोविडची बाधा फक्त परदेशातून आलेल्यांना बाधा असल्याचे आढळत होती.नंतर उच्च वसाहतींमध्ये कोविडची बाधा होऊ लागली.त्यानंतर मे महिन्यात झोपडपट्ट्या चाळींमध्ये कोविडचे रुग्ण आढळू लागले होते.तेव्हा कोविडचा पॉझिटीव्हीटी तर 27.69 टक्‍क्‍यांवर पोहचला होता.म्हणजे 100 कोविड चाचण्या झाल्यानंतर त्यात 27.69 टक्के बाधीत आढळत होते.दुसऱ्या लाटेत दिवसाला 11 हजार पर्यंत रुग्णांची नोंद होत होती.

सध्या 100 संशयीतांची चाचणी झाल्यावर अवघा एक रुग्ण आढळत आहे.तर,दिवसातील रुग्णांचे प्रमाणही 200 ते 300 मध्ये आले आहे.तर,ऑगस्ट महिन्या पासून रोज सरासरी 32 ते 33 हजार चाचण्या होत आहेत.अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आली आहे. कोविडची पहिली लाट ओसरल्यानंतर दुसऱ्या लाटेपुर्वी फेब्रुवारी 2021 च्या सुरवातील हाच पॉझिटीव्हीटी दर 3.25 टक्के होता.मात्र,फेब्रुवारीच्या तीसऱ्या आठवड्या पासून पुन्हा रुग्णांची संख्या वाढू लागली.

मृत्यूदरातही घट

-कोणत्याही आजारात मृत्यूदर कमी असणे गरजेचे आहे.पहिल्या लाटेत मार्च महिन्यात मृत्यूदर 12.04 टक्के होता.म्हणजे 100 रुग्णांपैकी 12 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होत होता.

-मे 2021 मध्ये कोविडची दुसरी लाट शिखरावर असताना मृत्यूदर नियंत्रणात होता.तेव्हा मृत्यूदर 2.5 टक्के होता.

-आता हा मृत्यूदर 2.1 टक्‍क्‍यां पर्यंत आहे.

-मृत्यूदर 1 टक्‍क्‍यांहून खाली आणण्याचे आव्हान

तिसऱ्या लाटेचे आव्हान काय ?

-पॉझिटीव्हीटी दर नियंत्रणात ठेवणे

-त्यासाठी स्क्रिनींग,विलगीकरण वाढवणे

-रुग्णांना तत्काळ उपचार देणे

-प्राणवायूचे नियोजन

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT