घाटकोपर : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर, काही पूर्णपणे बरे होऊन घरीदेखील परतत आहे. तरीही नागरिक अशा व्यक्तींवर बहिष्कार टाकत असल्याचे प्रकार अनेक ठिकाणी समोर येत आहेत; मात्र घाटकोपरमध्ये बरी होऊन घरी परतलेल्या युवतीचे परिसरातील रहिवाशांनी टाळ्या वाजवून स्वागत केले आहे. त्यामुळे तरुणीदेखील भारावून गेली.
घाटकोपरच्या भटवाडी भागातील महाकाली परिसरात राहणाऱ्या युवतीला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे तिच्या संपर्कात आलेल्या घरच्या सदस्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर 14 दिवस क्वारंटाईन करण्यात आले होते. तर, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या युवतीला चांदीवलीतील एमसीएमसीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 14 दिवसांनंतर डॉक्टरांनी पुन्हा तपासणी केल्यानंतर युवतीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर युवतीला घरी पाठवण्यात आले आहे. रिपोर्ट निगेटिव्ह येऊनही कोरोनाची लागण आणि लोकांमध्ये असलेली याबाबतची मानसिकता यामुळे युवती नैराश्यात होती. लोक कोणत्या भावनेने बघतील, अशी चिंता तिला सतावत होती; मात्र सोसायटीतील रहिवाशांनी तिला सुखद धक्का दिला.
भटवाडीतील महाकाली परिसरात युवती घरी परतताच माजी नगरसेवक दिपक हांडे यांच्यासह रहिवाशांनी तिचे टाळ्या वाजवून स्वागत केले व तिला धीर दिला . सध्या या युवतीला डॉक्टरांनी 14 दिवस काळजी म्हणून घरीच क्वारंटाईन राहण्यास सांगितले आहे.
महत्वाची बातमी : राज्यात 20 एप्रिलपासून अंशत: उद्योग व्यवसाय सुरु करणार, मात्र....वाचा बातमी सविस्तर
खचले होते; मात्र आता जगण्याची उर्मी आली
आपल्या अनोख्या स्वागताबाबत युवतीने सांगितले की, कोरोना आजाराशी सध्या अख्खा देश लढत आहे. हा संसर्ग कधीही कुणालाही होऊ शकतो. त्यामुळे सर्व नियमांचे पालन करत असतानाच कोरोना रुग्णाच्या बाबतीत लोकांनी द्वेषाची भूमिका बदलायला हवी. बरेच रुग्ण या संसर्गातून बरे होत आहे. मी सुद्धा खचले होते; मात्र लोकांनी टाळ्या वाजवून ज्या पद्धतीने माझे स्वागत केले, त्यामुळे पुन्हा नवे आयुष्य जगण्याची उर्मी आली आहे .
The Corona negative Girl was worried about how people would look at her, read detail story
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.