file photo 
मुंबई

मुंबईत कोरोना बाधित आणखी वाढले...वाचा बातमी 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आज 135 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वाढू लागल्याचे दिसते. तर आज 6 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 131 वर पोहोचला आहे. 


मुंबईतील कोरोना बाधित तसेच मृतांचा आकडा नियंत्रणात येत असल्याचे दिसत असतानाच आज पुन्हा एकदा बाधित रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. आज नवे 135 रुग्ण आढळल्याने बाधित रुग्णांची संख्या 2798 इतकी झाली आहे. यात खासगी लॅब मध्ये 14 ते 16 एप्रिल दरम्यान चाचणी केलेल्या बधितांचा देखील समावेश आहे.

तर आज मृत्यू झालेल्या 6 जणांपैकी 5 महिला व एका पुरुषाचा समावेश असून पाच जणांना दीर्घकालीन आजार होते तर एका रुग्णाचे वार्धक्‍य हे कारण असल्याचे सांगण्यात येते. 
आज एकूण 303 संशयितांना दाखल करण्यात करण्यात आले असून आतापर्यंत 6413 रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आज 29 रुग्ण बरे झाले असून मुंबईत आतापर्यंत 310 रुग्णांना घरी सोडण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT