color-mask
color-mask sakal media
मुंबई

रंगीबेरंगी मॅचिंग मास्‍कला पसंती; नोकरदार महिलांकडून मागणी

सकाळ वृत्तेसवा

तुर्भे : कोरोना काळात (corona pandemic) रंगीबेरंगी मास्कला (colorful mask) मागणी प्रचंड वाढली. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून (precautions) मास्‍क अत्‍यावश्‍यक आहे. नवरात्रोत्‍सवासाठी (Navratri festival) नऊ रंगांच्या साड्या/ड्रेसवर मॅचिंग (cloths trends) मास्कही (matching mask) बाजारात दाखल झाले आहेत. विशेषतः नोकरदार महिलांकडून त्‍यांना अधिक मागणी आहे.

कोरोनाचे सर्व नियम पाळून कोरोना साजरा करण्याचे आवाहन सरकारने शहरातील सर्व सार्वजनिक उत्सव मंडळांना केले आहे. या पार्श्वभूमीवर गतवर्षीप्रमाणे यंदाही रास दांडियाला ब्रेक लागला आहे. नवरात्रीत नऊ रंगांना अधिक महत्त्व असते. महिला वर्गामध्ये या नऊ रंगांचे अधिक आकर्षण असल्याने त्या त्या दिवसाच्या रंगाप्रमाणे साडी/ड्रेसबरोबर त्याला मॅचिंग टॅटू काढण्याचाही अलीकडे ट्रेण्ड आहे.

नत्ररात्रोत्‍सवात यंदा राखाडी, नारिंगी, सफेद, लाल, निळा, पिवळा, हिरवा, जांभळा, गुलाबी हे रंग असून महिलांसाठी जरीची, खणांचे, कॉटन मास्‍कवर लेस लावलेले विविधरंगी मास्‍क उपलब्‍ध आहेत. नऊ रंगांचा सेट अनेक दुकानदारांनी विक्रीसाठी ठेवला आहे.

"सध्या मॅचिंग साड्या व ड्रेसच्या रंगानुसार मास्कची मागणी वाढली आहे. त्यानुसार आम्ही नऊ रंगाचे मास्क विक्रीस ठेवले आहेत."
सुरेश कोशल, व्यावसायिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT