मुंबई

धक्कादायक बातमी: 'टाटा आमंत्रा' येथे कोरोना रुग्णाची आत्महत्या

सुचिता करमरकर

कल्याण :  डोंबिवलीतील नवापाडा येथे राहणाऱ्या (वय 38) या कोरोना बाधित रुग्णाने आज आत्महत्या केली. 17 जुलै रोजी कल्याण-डोंबिवली पालिकेने या रुग्णाला भिवंडी रस्त्यावरील 'टाटा आमंत्रा' येथे विलगीकरण कक्षात दाखल केले होते. आज रुग्णास अधिक उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची आवश्यकता असल्याने त्यांना खाली उतरवण्यात येत असतानाच त्यांनी पाचव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली.

रुग्णाच्या कुटूंबातील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची ही तपासणी केली होती. त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यावर टाटा आमंत्रा येथे दाखल करण्यात आले होते. मागील दोन दिवस त्यांची प्रकृती ठीक होती. मात्र आज सकाळपासून ते मानसिक तणावाखाली असल्याचे त्यांच्या एका नातेवाइकाने सांगितले. यासंदर्भात पोलिसांकडून अधिक माहिती घेतली जाईल असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे मात्र मागील दोन दिवसात या रुग्णाचे वागणे विक्षिप्त असल्याचे तेथील काही कर्मचाऱ्यांनीही सांगितले आहे. मृत रुग्णाला टाटा आमंत्रा येथे नवव्या मजल्यावर दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना औषधोपचारांसाठी पाचव्या मजल्यावर आणले असता हा प्रकार घडला असावा असे प्रथमदर्शनी सांगण्यात आले. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या या रुग्णाच्या पश्चात पत्नी, दोन वर्षाची मुलगी, वडील असा परिवार आहे
------------------------------

Edited by Tushar Sonawane

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Quota Conflict: मराठा आरक्षण मूळ ओबीसींच आरक्षण कसं खाणार...? पुढच्या १० वर्षात भीषण परिस्थिती, अभ्यासक काय म्हणतात?

Latest Marathi News Updates : चामोर्शी-मूल, आष्टी, घोट मार्ग दुरुस्तीसाठी तात्काळ निधी मंजूर करण्याची मागणी

मनपा निवडणुकीपूर्वी मनसेला मोठा धक्का! प्रकाश महाजन यांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र', कारण काय?

Aurangzeb Poster Incident : औरंगजेबाच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक; अकोल्यात तणावाचं वातावरण, आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

तुळजाभवानी देवीचं व्हीआयपी दर्शन होणार महाग, २० सप्टेंबरपासून पासचे नवे दर लागू, नवरात्रोत्सवाआधी मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT