मुंबई

उपचार केलेला रुग्ण पॉझिटिव्ह; उल्हासनगरमधील शिवनेरी रुग्णालय सील...

सकाळवृत्तसेवा

उल्हासनगर : दिवा येथे राहणाऱ्या एका रुग्णाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याने उपचार घेतलेले उल्हासनगरमधील शिवनेरी रुग्णालय सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. दिवा येथे राहणारा रुग्ण 3 एप्रिल रोजी उपचारासाठी शिवनेरी रुग्णालयात आला होता. संशयित वाटल्याने त्याला ठाण्यातील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले होते. आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खबरदरीचा उपाय म्हणून शिवनेरी रुग्णालय सील करण्यात आले. 

संबंधित रुग्णाने शिवनेरी रुग्णालयात आधी तपासणी केल्यामुळे तेथील डॉक्‍टर, परिचारिका आणि कर्मचारी यांना कोरोनाच्या संसर्गाचा धोका आहे. त्यामुळे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी रुग्णालय सील करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी आणि विठ्ठलवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश भामे यांनी रुग्णालय सील करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. रुग्णालयात विविध आजारांवरील उपचार घेण्यासाठी दाखल असलेल्या 10 रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्याचे गणेश शिंपी यांनी सांगितले. 

पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शिवनेरी रुग्णालयातील डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांची हाय रिस्क आणि लो रिस्क अशी वर्गवारी करण्यात आली असून त्यांचे स्वाबचे नमुने मध्यवर्ती रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. शिवनेरी रुग्णालयाचे डॉक्‍टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना भिवंडी बायपास मार्गावरील एका इमारतीत क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त सुधाकर देशमुख आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजा रिझवानी यांनी दिली.

corona patient found positive in shivneri hospital municipal corporation sealed hospital 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT