sanitization 
मुंबई

मुंबईकरांनो सावधान! इमारतींमध्ये वाढतायत कोरोनाचे रुग्ण; गेल्या १० दिवसात इतक्यानं वाढ..  

समीर सुर्वे

मुंबई: मुंबईतील इमारतींमधील कोविडचे रुग्ण वाढू लागले आहेत. 29 जून रोजी इमारतींमध्ये राहणाऱ्या रुग्णांची संख्या 38 टक्के होती तर 9 जुलै रोजी 39 टक्के झाली आहे. तर सिल इमारतींची संख्याही 1 200 ने वाढली आहे. तर,वस्त्या आणि चाळीतील रुग्णांची संख्या 1 टक्क्यांनी घटली आहे.तर 8 लाख 83 हजार नागरीकांची प्रतिबंधातून मुक्त झाले आहे.सध्या 52 लाख 61 हजार नागरीक प्रतिबंधात आहेत.

मुंबईतील इमारती मधिल 18 हजार 745 रुग्णांवर सध्या उपचार सुरु असून वस्त्या आणि चाळीतील 28 हजार 575 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 29 जून रोजी इमारतींमधिल 16 हजार 217 रुग्ण आणि वस्त्या,चाळीतील 25 हजार 931 रुग्ण होते.

अंधेरी पासून दहिसर पर्यंतच्या परीसरात इमारतीतील रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. अंधेरी जोगेश्वरी पश्चिम के पश्चिम परीसरात 319 आणि के पुर्व अंधेरी, जोगेश्वरी पुर्व परीसरात 372 रुग्ण वाढले आहेत. मालाड मध्ये 268, कांदिवलीत 233 रुग्ण वाढले आहेत. तर पुर्व उपनगरातील भांडूप विक्रोळी पवई भागातील इमारतींमध्ये 272 रुग्ण वाढले आहेत.

29 जुलै पर्यंत मुंबईतील अंदाजे निम्मी लोकसंख्या 61 लाख 45 हजार नागरीक प्रतिबंधित क्षेत्रात होते. तर 9 जूलै रोजी 52 लाख 61 हजार नागरीक प्रतिबंधित क्षेत्रात आहेत.

कोविड 9 जूलै: 

इमारती: 

सिल इमारती -6,597 

प्रतिबंधित लोकसंख्या - 9,77,774 

रुग्ण - 18,745

वस्त्या चाळी:

सिल वस्त्या,चाळी - 751

लोकसंख्या -- 42,83,788

रुग्ण -28,575 

कोविड 29 जून: 

इमारती: 

सिल इमारती - 5,875

लोकसंख्या - 14,31,512

रुग्ण -16,217

वस्त्या ,चाळी:  

 सिल वस्त्या चाळी -- 750 

लोकसंख्या -- 4713779 

रुग्ण -25931 

संपादन : अथर्व महांकाळ 

corona patients are increasing in buildings of mumbai 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT