Corona Patient sakal
मुंबई

मुंबईत कोरोनाचा आलेख घसरला; पॉझिटिव्हिटी दर सर्वात कमी

मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईसह राज्यभरातील कोरोना संसर्ग (corona infection) नियंत्रणामध्ये आणण्यात यश मिळत आहे. गेल्या आठवड्याभरात पॉझिटिव्हिटी दर कमी करण्यात संपूर्ण राज्यामध्ये मुंबई शहराला सर्वाधिक यश आले आहे. राज्यात शहरांमध्ये मुंबईचा पॉझिटिव्हिटी दर (Mumbai positivity rate) सर्वात कमी असल्याची नोंद झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यभरात कोरोना रुग्णांचा चढ-उतार बघायला मिळत आहे. मुंबईने कोरोना बाधित रुग्णांच्या (Mumbai corona patients) संख्येवर कमालीचे नियंत्रण मिळवले आहे. जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कमी पॉझिटिव्हिटी रेट पालघर जिल्हा (7.54 टक्के)आहे.तर राज्यभरातील शहरांमध्ये मुंबईचा पॉझिटिव्हिटी दर सर्वात कमी (8.58 टक्के) आहे.

राज्यातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट 23.82 टक्के आहे. राज्यात बावीस जिल्ह्यांमध्ये सरासरी पॉझिटिव्ह रेट हा राज्याच्या सरासरी पॉझिटिव्ह रेटपेक्षा अधिक आहे. या जिल्ह्यांमध्ये रुग्ण वाढ मोठ्या प्रमाणात होत असून चिंता वाढली आहे. राज्यातील सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट हा नागपूर जिल्ह्यामध्ये (44.59 टक्के)आहे. त्या खालोखाल पुणे ( 42.49), नाशिक (40.94), गडचिरोली (39.18 ) आणि वर्धा ( 38.11) या जिल्ह्यांमध्ये साप्ताहिक पॉझिटिव्हिटी तर अधिक आहे.

राज्यात नवीन रुग्णांची संख्या मात्र वाढत असल्याचे दिसते. त्या तुलनेत मृत्युदर नियंत्रणामध्ये असून मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. सप्टेंबर महिन्यात 1,06,041 नवीन रुग्ण सापडले होते. ऑक्टोबर (62,662), नोव्हेंबर (26,361) आणि डिसेंबर (43,759) महिन्यात रुग्ण संख्या नियंत्रणामध्ये आली. मात्र जानेवारीत नवीन रुग्णांची संख्या या प्रचंड वाढली असून आत्तापर्यंत 9,22,882) रुग्णांची भर पडली आहे. सप्टेंबर महिन्यात नवीन रुग्णांची संख्या सरासरी 3,535 इतकी होती तर जानेवारीमध्ये नवीन रुग्णांची सरासरी संख्या ही 35,95 जालावर पोहोचली आहे.

मृत्यूचे प्रमाण मात्र कमी होत असल्याचे दिसते. सप्टेंबर मध्ये 1,716 मृत्यू (1.62 टक्के),ऑक्टोबर 1,118 (1.78),नोव्हेंबर 474 (1.80),डिसेंबर आणि जानेवारीत मात्र मृत्यूची संख्या आणि प्रमाण काहीसे कमी झाले. डिसेंबर 233 (0.53)तर जानेवारी महिन्यात 661 (0.07) मृत्यूची नोंद झाली.

राज्यातील नवीन रुग्ण

महिना एकूण रुग्ण सरासरी रुग्णवाढ

सप्टेंबर 1,06,041 3,535

ऑक्टोबर 62,662 2,021

नोव्हेंबर 26,361 879

डिसेंबर 43,759 1,412

जानेवारी 9,22,882 35,495

राज्यातील मृत्यूचे प्रमाण

महिना मृत्यू मृत्युदर

सप्टेंबर 1,716 1.62

ऑक्टोबर 1,118 1.78

नोव्हेंबर 474 1.80

डिसेंबर 233 0.53

जानेवारी 661 0.07

राज्यातील सर्वाधिक पॉझिटिव्हीटी दर (टक्के)

नागपूर - 44.59

पुणे - 42.49

नाशिक - 40.94

गडचिरोली - 39.18

वर्धा - 38.11

राज्यातील कमी पॉझिटिव्हीटी दर

मुंबई - 8.59

बुलडाणा - 11.39

परभणी - 11.49

रत्नागिरी - 12.26

बीड - 13.16

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NANA PATEKAR: “त्रास होतोय...” रात्री अडीच वाजता शेवटचा फोन... मित्राने उचलला नाही; चार वाजता नाना बेशुद्ध अवस्थेत सापडले, काय घडलं?

NANA PATEKAR: ‘तो’ OUT झाला की नाना पाटेकर जेवणच सोडायचे! कोण होता नानांचा फेव्हरेट क्रिकेटर? बालपणी होते ऑफ स्पिनर; क्रिकेटवर होतं जबरदस्त प्रेम

Latest Marathi News Live Update : राजू माधुरी हत्तीण परत आणलास, अशक्य गोष्ट करून दाखवलीस; माधुरीला भेटायला येईन..

Petrol-Diesel Price: नायरा एनर्जीची दरवाढ, CNGही महागलं! आज तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेलचे दर किती?

Nana Patekar: 'आज एका युगाचा अस्त झाला', नाना पाटेकर यांच्या निधनाने रितेश देशमुख भावूक; पोस्ट करत म्हणाले...

SCROLL FOR NEXT