Corona patients sakal media
मुंबई

रुग्णसंख्येचा विस्फोट! मुंबईत एका दिवसात दहा हजार रुग्णांचा टप्पा पार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: आज मुंबईमध्ये १० हजार ८६० रुग्ण सापडले आहेत. मुंबईमध्ये रुग्णसंख्येने १० हजारांचा टप्पा गाठला आहे. तर आज २ जणांचा मृत्यू झाला आहे. कालच बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी घोषित केलं होतं की, वीस हजार रुग्णांचा टप्पा गाठल्यास लॉकडाऊन लागू करण्यात येईल. त्यांच्या या घोषणेनंतरच्या दुसऱ्याच दिवशी दहा हजार रुग्णांचा टप्पा मुंबईने गाठला आहे. दुसरीकडे आता हळूहळू देशातील इतर शहरातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता कडक निर्बंध लागू करण्यास सुरुवात झाली आहे.

दिल्लीत विकेंड लॉकडाऊन

राजधानी दिल्लीत कोरोनाच्या ओमिक्रॉन या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढला असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही संसर्ग झाला आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन दिल्लीत शनिवार आणि रविवार ( वीकेंड) असे आठवड्यातील दोन दिवस पूर्ण संचारबंदी (कर्फ्यू) लागू करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज ही घोषणा केली. दिल्लीच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आज बैठक पार पडली त्यात ओमिक्रॉनच्या संसर्गाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी ही घोषणा केली.

आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक घेतली आहे. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुणे जिल्ह्यासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत.

पुण्यात असे असतील निर्बंध

  • पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्षात बंद राहतील; ऑनलाईन सुरु राहतील

  • नववी-दहावीचे वर्ग प्रत्यक्षात सुरु राहतील

  • मास्क नसेल तर 500 रुपये दंड

  • मास्क असताना थुंकला तर 1000 रुपये दंड

  • लसीचे दोन डोस घेतलेले नसतील तर कुठेही प्रवेश मिळणार नाही.

  • हॉटेल असो वा शासकीय कार्यालय असो, दोन डोसशिवाय कुठेही प्रवेश मिळणार नाही.

  • या नियमांचं तंतोतंत पालन होईलच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT