Crime esakal
मुंबई

Mumbai News : कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल

कोरोना काळात महापालिकेकडून करण्यात आलेल्या खिचडी वितरणात घोटाळा प्रकरणी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - कोरोना काळात महापालिकेकडून करण्यात आलेल्या खिचडी वितरणात घोटाळा प्रकरणी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी गुन्हा दाखल केला आहे. खासदार संजय राऊत यांचे विश्वासू सुजीत पाटकर यांच्यासह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यात फसवणूक, फौजदारी विश्वासघात, कट रचणे, आदी कलमांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 6.37 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या पूर्वी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी महापालिका अधिकारी, कर्मचारी व इतर व्यक्तींची आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली होती. कोरोना काळात कामगारांना वाटप करण्यासाठी महापालिकेकडून खिचडी करण्यात आली होती. महापालिकेत करोना काळात 160 कोटींचा खिचडी गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली होती.

सूरज चव्हाणांची चौकशी

खिचडी घोटाळा प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुरज चव्हाण यांची यांची 22 ऑगस्ट रोजी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली. सूरज चव्हाण आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. मुंबई महापालिकेतर्फे खिचडी वाटपासाठी कंपन्यांना दिलेल्या कंत्राटांशी संबंधित आर्थिक अनियमिततेबद्दल सूरज चव्हाणांची चौकशी करण्यात आली. यापूर्वी या प्रकरणी ईडीने दिलेल्या माहितीच्या आधारे प्रदान चव्हाण यांची मागील महिन्यात आर्थिक गुन्हे शाखेने 6 तास चौकशी केली होती.

आरोप

कोरोना काळात काही नेत्यांनी स्थलांतरित मजुरांना खिचडी पॅकेट पुरवण्याचे कोट्यवधींचे कंत्राट मुंबई महापालिकेकडून मिळवले. लॉकडाऊन काळात मुंबईतील स्थलांतरित मजुरांना 25 खिचडी पॅकेट पुरवण्यात आले होते. यात 160 कोटींचा खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

खिचडी पॅकेट पुरवण्याच्या नावाखाली ठाकरे गटाच्या काही नेत्यांनी महापालिकेकडून 8.10 कोटी रुपये मिळवल्याचा आरोप आहे. त्यातील 4 कोटी बोगस कंपन्यांना वळवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच नेत्यांनी बोगस कंपन्या आणि नेत्यांच्या नावावर हा कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. यापूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या घोटाळ्याची माहिती उघड केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : कमी दाबाचा पट्टा सक्रिय पण महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार; पुढच्या चार दिवसांचा हवामान अंदाज असा

Ashadhi Ekadashi 2026 Marathi Wishes: "अवघा रंग एक झाला..." आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा विठ्ठलभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

Vidhansabha: संसदीय परंपरा आणि कायदा कसा बनतो? विद्यार्थ्यांनी समजून घेतली प्रक्रिया! मुख्यमंत्र्यांकडून भरभरून कौतुक!

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT