मुंबई

सात महिन्यांत पहिल्यांदाच मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह दर 14 टक्क्यांपेक्षा खाली

भाग्यश्री भुवड

मुंबई: मुंबईतील गेल्या सात महिन्यांत कोविड पॉझिटिव्ह दर पहिल्यांदाच 14 टक्क्यांपेक्षा खाली आला आहे. पालिकेच्या डॅशबोर्डच्या मते, पॉझिटिव्ह दर 16.07 टक्क्यांवरून 13 डिसेंबरपर्यंत 13.89 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. जो 13 नोव्हेंबर
पर्यंत कायम होता. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, यासाठी बरीच कारणे आहेत. ज्यामुळे मुंबईतील केसेसमध्ये नियंत्रण मिळवणे सोपे झाले आहे.

पालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकणी यांनी सांगितले की, मुंबईत दररोजच्या केसेसमध्ये नियंत्रण येण्याची अनेक कारणे आहेत. सणांच्या काळादरम्यान केसेसमध्ये वाढ होण्याची शक्यता होती. गेल्या सात महिन्यांत 35 टक्क्यांहून 14 टक्क्यांपर्यंत आणण्यात यश येतंय. दर महिन्याचा पॉझिटिव्ह दर ही कमी होऊन 4 टक्क्यांपर्यंत आला आहे. 

पालिकेच्या उपायायोजनांना यश

पालिकेने राबवलेल्या उपायायोजना आणि सर्वांनी दिलेली साथ यामुळे पॉझिटिव्ह दर कमी आणण्यात यश आले आहे. सणांच्या दरम्यान पॉझिटिव्ह दरामध्ये किंचित वाढ होईल अशी आमची अपेक्षा होती. मात्र, मुंबईचा आठवड्याचा दर आणि रिकव्हरी दर वाढला आहे, असे ही काकाणी यांनी स्पष्ट केले आहे.

चाचण्यांचा वेग वाढला

ऑगस्टमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानंतर चाचण्यांना वेग आला होता. परिणामी अधिक केसेस आढळल्या. दिवाळीनंतर दररोज जवळपास 15 ते 17 हजार चाचण्या घेतल्या जात आहेत अशी ही माहिती त्यांनी दिली. कोविड -19 चाचणीतही 50 टक्क्यांनी वाढ केली आहे. 24 ऑगस्टपर्यंत मुंबईतील सरासरी 5,500 चाचण्या घेत होतो. पण, आता ही संख्या जवळपास 16,000 आहे. 

त्रिसूत्री जीवनाचा अविभाज्य घटक

जोपर्यंत लस येत नाही आणि कोरोना पूर्णपणे नियंत्रणात येत नाही तोपर्यंत त्रिसूत्री पाळणे गरजेचे आहे. मास्क, सोशल डिस्टसिंग आणि हात स्वच्छ धुणे ही त्रिसूत्री जीवनाचा अविभाज्य घटक आहे. या त्रिसूत्रीचा वापर करणे आवश्यक आहे असेही काकाणी यांनी सांगितले.

35 टक्क्यांहून 14 टक्क्यांवर दर

दरम्यान, दोन दिवसांपासून शहराचा दररोजचा पॉझिटिव्ह दर 4% पर्यंत खाली आला आहे. कोविड -19 चाचणीसाठी मानक मानल्या जाणार्‍या आरटी-पीसीआर चाचणीचा पॉझिटिव्ह दर 6% आहे, तर जलद प्रतिजैविक चाचण्यांसाठी पॉझिटिव्ह दर 2 टक्क्यांवर स्थिर आहे. मुंबईत गेल्या आठवड्यात दोन दशलक्ष कोविड -19 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.

मे महिन्यात शहरात पॉझिटिव्हीचे प्रमाण 35% ते 40% पर्यंत पोहोचले होते. त्यात सप्टेंबरमध्ये घट दिसून आली. ऑक्टोबरच्या शेवटी, दररोजचा पॉझिटिव्ह दर 10% पर्यंत खाली आला होता. तज्ज्ञांच्या मते शहरात रोगाचा संसर्ग कमी होण्याचे लक्षण मानले जाऊ शकते.

-------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Corona positive rate in Mumbai below 14 per cent seven months BMC succeeds

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast : दिल्लीतील न्यायालये बॉम्बने उडवण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर; लाल किल्ला स्फोटानंतर राजधानीत पुन्हा खळबळ

मुश्रीफ-घाटगेंची युती अनपेक्षित नाही, दोघांनी लोकसभेला मला फसवलंय; संजय मंडलिक यांचा आरोप

Nashik Crime : नाशिक गोळीबार प्रकरण: 'पीएल ग्रुप'च्या टोळीतील संशयित आरोपी वेदांत चाळगेला उत्तरप्रदेशातील बागपत येथून अटक

Latest Marathi Breaking News : मंडणगड तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! २ जणांचा मृत्यू, तर दोन जण गंभीर जखमी

Mumbai Viral Video: मर्द को भी दर्द होता है... मुंबईत स्टेशनवर काय घडलं? लोकलची वाट पाहणारा तरुण का रडत होता?

SCROLL FOR NEXT