Corona patient Sakal
मुंबई

राज्याला दिलासा! कोरोनाचा विळखा होतोय सैल

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 77.63% बेड रिक्त

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : देशात कोरोनाच्या (Corona)नवीन रूपांबाबतच्या बातम्यांदरम्यान महाराष्ट्रातून एक चांगली बातमी समोर आली आहे. राज्यातील दैनंदिन कोरोना चाचणीचा पॉझिटिव्हीटी दर 4 टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. पॉझिटिव्हीटीचे प्रमाण (Positivity Rate)कमी झाल्याने म्हणजेच नवीन रूग्णांची संख्या कमी असल्याने राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये(Medical College)व रुग्णालयांमधील कोविड बेडही बऱ्यापैकी रिक्त झाले आहेत.(Corona positivity rate decreases as 77.63% beds vacant in government hospitals and colleges)

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयानुसार, राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमधील 77 टक्के बेड रिक्त आहेत. मुंबईसह राज्यातील अनेक कोविड समर्पित रुग्णालयांचे बेडही रिक्त होत आहेत. त्यामुळे, गेल्या दोन महिन्यांपासून जास्तीत जास्त संक्रमणाचा सामना करणार्‍या महाराष्ट्राला आता दिलासा मिळाला आहे.

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अहवालानुसार, राज्यातील 20 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोना रूग्णांच्या उपचारांसाठी 8224 बेड्स राखीव ठेवण्यात आले होते. मात्र, सद्यस्थितीत या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 77.63 टक्के बेड रिक्त आहेत.

8224 बेड्सपैकी केवळ 1839 बेड्स भरले असून तिथे कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. या अहवालानुसार, मुंबईतील जीटी रुग्णालय, नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे जास्त बेड रिक्त आहेत. या तीन सरकारी रुग्णालयात 96 टक्के बेड रिक्त आहेत.

तर, यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 93 टक्के बेड रिक्त आहेत. नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 93 टक्के बेड रिक्त आहेत. त्याचप्रमाणे चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालयात 91 टक्के बेड रिक्त आहेत, मुंबईतील कामा आणि आल्बेस रुग्णालयात 86 टक्के आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात 85 टक्के बेड रिक्त आहेत.

दरम्यान,मिरज आणि कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात फारच कमी बेड रिक्त आहेत. मिरजमध्ये 14 टक्के तर कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात फक्त 20 टक्के बेड रिक्त आहेत.

राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप आवटे म्हणाले की, आरोग्य विभागाच्या ठोस नियोजनामुळे राज्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत आहे. यामुळेच रूग्णालयात बेड रिक्त असल्याचे दिसून येते. सध्या फक्त 9 ते 10 हजारांच्या घरात रुग्णसंख्या आढळत आहे. त्यामुळे, बेड्स रिक्त असल्याचे समोर येत आहे. मात्र, राज्यातील काही भाग असे ही आहेत जिथे संसर्ग पसरला आहे. तिथे रुग्णसंख्या वाढलेली दिसते. त्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला डावलून शुभमन गिलला संधी; मांजरेकर बसरले, 'हा अन्याय आहे...'

Viral: पतीने गर्भनिरोधक गोळी खरेदी केली, ऑनलाइन पैसे दिले, पण एक छोटी चूक अन् पत्नीसमोर अनैतिक संबंधाचे बिंग फुटले!

Latest Marathi News Updates : ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर

BCCI चा मोठा निर्णय! एकदिवसीय क्रिकेटला नवा आकार; प्लेट ग्रुप सिस्टीम लागू, नेमका बदल काय होणार?

Shirur Crime : मेडिकल चालकाची डॉक्टरला शिवीगाळ करीत पट्ट्याने मारहाण; डॉक्टर जखमी

SCROLL FOR NEXT