मुंबई

अर्भकांमधील अँटीबॉडीज उलगडणार महत्त्वाचे धागेदोरे, कोरोनाच्या पुढील संशोधनाला मुंबईत सुरवात

समीर सुर्वे

मुंबई : कोविडची बाधा झालेल्या अर्भकांमधील अँटीबॉडीजबाबत महानगर पालिकेने तपासणी सुरु केली आहे. अर्भकांना कोविडची लस देण्याचा विचार झाल्यास या अभ्यासाचा उपयोग करता येणार आहे.

महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी कोविडची लस घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अर्भकांबाबत सुरु असलेल्या चाचणीची माहिती दिली. महापालिकेच्या कस्तुरबा आणि नायर रुग्णालयात अशी चाचणी करण्यास सुरवात झाली आहे. कोविडबाधित गर्भवती मातांपासून कोविड काळात काही अर्भकांना कोविडची बाधा झाली होती. ‘कोविडची बाधा होऊन त्यावर मात केलेल्या अर्भकांच्या रक्ताचे नमुद घेऊन त्यांच्या शरीरातील प्रतिजैविकांची तपासणी करण्यात येणार आहे. या अर्भकांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाली आहेत का हे तपासले जाणार आहे.

या अभ्यासचा वापर भविष्यात बालकांना लस देण्याचा विचार झाल्यास त्यासाठी करता येऊ शकतो असे काकाणी यांनी सांगितले.सध्या 18 वर्षावरील नागरीकांना लस देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोविड लसीच्या चाचणीत 18 वर्षाखालील रुग्णांचा समावेश करण्यास करण्यात आला नव्हता. त्यामुळे आता 18 वर्षाखालील नागरीकांना लस न देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. असे  पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

कोविड लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरवात झाली आहे. सध्या महानगर पालिकेकडे 2 लाख 65 हजार लसींचा साठा आहे. तसेच, आवश्‍यकतेनुसार केंद्र सरकारकडून लसीचा साठा मिळू शकतो असेही काकाणी यांनी सांगितले.

महानगर पालिकेने कोविड काळात म्हाडा तसेच इतर प्राधिकरणांकडून इमारती ताब्यात घेतल्या होत्या. या इमारतींमध्ये कोविड केंद्र तसेच विलगीकरण केंद्र तयार करण्यात आले होते. आता कोविड नियंत्रणात असला तरी हे केंद्र बंद करण्यात येणार नाही. 31 मार्च नंतर परीस्थीतीचा अंदाज घेऊन याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही काकाणी यांनी सांगितले. 

mumbai news corona research testing of antibodies in just born babies after transmission of corona virus by mother

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT