संग्रहित छायाचित्र 
मुंबई

#कोविड_19 : साडेआठ हजार पोलिसांचे सुटीसाठी अर्ज

सकाळवृत्तसेवा

मुंबई : देशात कोरोनाने थैमान घातला असून, त्यातून पोलिसही सुटलेले नाहीत. कोरोनाचा प्रभाव वाढू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील जवळपास साडेआठ हजार पोलिसांनी सुटीसाठी अर्ज केले आहेत. मात्र, पोलिस आयुक्तांनी सर्वांच्याच सुट्या रद्द केल्याने त्यांच्यासमोर पेच उभा राहिला आहे.

हेही वाचा :  खासगी रुग्णालयता ताप सर्वेक्षण कक्ष​

सध्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सुट्यांचे अर्ज पोलिस उपायुक्त कार्यालय अथवा पोलिस ठाण्यांत पडून आहेत. केवळ वैद्यकीय कारण असेल तरच अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुटीवर सोडण्यात येत आहे. कोरोनाच्या संसर्गाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. सध्या समूह संसर्ग होत असल्याचे समोर आले आहे. त्यातही मुंबई शहरात कोरोना संसर्गाच्या रुग्णांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे पोलिसांनीही अतिधोकादायक ठिकाणांना सील करण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाऊनच्या काळात नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. दुसरीकडे भुकेल्या नागरिकांच्या जेवणाचीही व्यवस्था करण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. मात्र, दरम्यान ऑनड्युटी पोलिसांनाही कोरोनाची लागण होण्याच धोका अधिक आहे.

हे वाचलं  का? : कोरोनाला रोखण्यासाठी आता आयुष डाॅक्टरांची फौजही मदतीला

वैद्यकीय कारण असेल तरच सुटी
दुसरीकडे रेल्वे पोलिस, सीआयएसएफ आणि मुंबई पोलिस दलातील काही जणांना कोरोना झाल्याने इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही त्याची भीती सतावत आहे. त्यामुळे स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी त्यांनी सुटीसाठी अर्ज केला आहे. असे साडेआठ हजार अर्ज पडून असून, मुंबईतील परिस्थिती लक्षात घेता अद्याप त्यांना सुटी देण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत वैद्यकीय कारण सोडता कोणालाही सुटी मिळणार नसल्याची भूमिका वरिष्ठ अधिकाऱ्यानी घेतली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT