rto-driving-license
rto-driving-license sakal media
मुंबई

'या' लायसन्ससाठी मुंबईत तीन महिन्यांचे वेटिंग; ऑनलाईन समस्येमुळे अडचणी

प्रशांत कांबळे

मुंबई : कोरोना (corona) निर्बंध शिथिल झाल्यानंतर आता आरटीओ (RTO) सुरू झाले आहे. शिकाऊ लायसन्स (learning license) काढल्यानंतर 6 महिन्याची मुदत असते मात्र, दरम्यानच्या काळात मुदत संपणाऱ्या शिकाऊ लायसन्सला कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे (corona lockdown) 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, आता पक्क्या लायसन्ससाठी (main license) नागरिकांना आरटीओचे खेटे मारावे लागत आहे. ऑनलाईन स्लॉट (online) मिळत नसून, ताडदेव आरटीओमध्ये पक्या लायसन्ससाठी तीन महिन्यांचे वेटिंग (waiting) आहे.

मुंबईसारखीच परिस्थिती इतर ही आरटीओची आहे. सारथीचे नेटवर्क सुद्धा अर्ध्यावेळ बंद असल्याने नागरिकांना ऑनलाईन स्लॉट बुक करण्यात अडचणी जात आहे. शिवाय उपनगरातील आरटीओ कार्यालयांमध्ये सुरुवातीला जास्त स्लॉट दिले नसल्याने पक्या लायसन्ससाठी अर्ज सुद्धा अनेकांना करता येत नव्हते मात्र आता जास्त स्लॉट उपलब्ध असल्यानंतर तब्बल तीन ते चार महिन्यांनंतरची प्रतिक्षेनंतरची तारीख दिल्या जात आहे. शिवाय परिवहन विभागाचा शिकाऊ लायसन्स ऑनलाईन करून आरटीओ कार्यालयातील गर्दी कमी करण्याचा उद्देश फसल्याचे दिसून येत असून, पक्क्या लायसन्ससाठी आरटीओ मध्ये गर्दी दिसून येत आहे.

एजंटकडूनच स्लॉटची मिनिटात बुकिंग

आरटीओ कार्यलयातून पक्या लायसंससाठी स्लॉट सोडण्यात येते, मात्र याची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे अवघ्या मिनिटातच एजंटकडूनच या स्लॉटवर कब्जा करून बुकिंग केल्या जात असल्याचे चित्र असून, सर्वसामान्य नागरिकांना मात्र, आपल्या कामासाठी आरटीओ कार्यालयाच्या चकरा कराव्याच लागत आहे.

"गेल्या महिन्याभरापासून पक्क्या लायसन्सच्या चाचणीसाठी शुल्क भरले आहे. परंतु स्लॉट बुकिंग करण्यासाठी 40 दिवसांची प्रतीक्षा सांगितले जाते. त्यामुळे 30 सप्टेंबरनंतर शिकाऊ लायसन्सची मुदत उलटल्यावर ते पुन्हा काढावे लागण्याची भीती आहे."

- वाहनचालक

सर्वसामान्यांनाच्या अडचणी काय आहेत ?

- शिकाऊ लायसन्सला लॉकडाऊनमुळे 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

- तत्पूर्वी पक्के लायसन्स काढण्यासाठी सारथी पोर्टलवर भलीमोठी प्रतीक्षा यादी

- गेल्या महिन्याभरापासून पक्क्या लायसन्सच्या चाचणीसाठी स्लॉट उपलब्ध नाही.

- आरटीओ कार्यालयाकडून स्लॉट कधी सोडले जातात, याबात कुठलीच माहिती नाही

- सर्वसामान्य नागरिकांना स्वतःहून स्लॉट बुकिंग करणे अशक्य

"कोरोनाच्या महामारीमुळे शिकाऊ लायसन्सला 1 फेब्रुवारी 2020 पासून मुदतवाढ दिली जात आहे. सध्या 30 सप्टेंबर पर्यंत मुदत असल्याने जुन्या शिकाऊ लायसन्स उमेदवारांना पक्के करण्यासाठी सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे वेटिंगचा कालावधी काढला आहे. शिवाय कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सुद्धा या अडचणी येत आहे."

- प्रकाश जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ताडदेव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: किर्गिस्तानमध्ये हिंसाचार चार पाकिस्तानी विद्यार्थी ठार; भारतीय विद्यार्थीही ठरले लक्ष्य

Online Vegetable Shopping : Blinkit भाजी खरेदीवर फ्री कोथिंबीर घेण्यास नकार! नेटकऱ्यांनी केली 'ही' मागणी

शरद पवारांना धक्का! 'या' नेत्याची 'राष्ट्रवादी'ला सोडचिठ्ठी; शिंदे म्हणाले, हातातोंडाशी आलेल्या मुलानं कायमस्वरूपी..

SCROLL FOR NEXT