ब्रेल लिपीतील पुस्तकाचे वाचन करताना अंध व्यक्ती sakal media
मुंबई

अंध नागरिकांसाठी पुस्तक प्रकाशित; कोविडसह विविध आजारांची माहिती ब्रेल लिपीत

मिलिंद तांबे

मुंबई : कोविडसह (corona) विविध आजार, त्याची कारणे व लक्षणे (symptoms) याची माहिती अंध व्यक्तींना (blind people) ही समजावी यासाठी लोकमान्य टिळक सार्वजनिक रुग्णालयाने (lokmanya tilak hospital) आजारांची माहिती देणारे पुस्तक (book) नुकतेच प्रकाशित केले. रुग्णालयातील प्राध्यापक तसेच डॉक्टरांनी (doctors) विविध आजारांची माहिती देणारे लेख यात लिहिले आहेत. अंधांसाठी उपयुक्त असणाऱ्या ब्रेल लिपीमध्ये (brailee lipi) देखील हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. नाशिक स्थित 'द ब्लाइंड वेलफेर संस्थेने (the blind welfare) असे पुस्तक ब्रेल लिपीत छापण्यास मदत केली आहे.

या पुस्तकात मधुमेह, कान, नाक, घशाचे आजार, नेत्रविकार तसेच कोव्हीड19, कर्करोग यासारखे असाध्य आजार इ. चा यथायोग्य परामर्श घेतला आहे. याशिवाय बालविकार व स्त्रियांचे आजार यांचाही स्वतंत्र लेख नमूद केला आहे अशी माहिती डॉ. सुजाता पोळ, सहयोगी प्राध्यापिका, जनऔषधवैद्यकशास्त्र विभाग यांनी दिली.

आजारांविषयी अनेक गैरसमज व चुकीच्या धारणा आहेत. बरेच आजार सुरुवातीला सर्वसाधारण स्वरूपातले असतात पण लोकांकडून अनेक वेळा चालढकल केली जाते.आरोग्यतज्ञांचा सल्ला घेण्यास किंवा आरोग्यकेंद्रात जाण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे साधारण आजार देखिल गंभीर स्वरूप घेतात. अशा वेळेस योग्य उपचाराची वेळ निघून गेलेली असते. आजारांबाबत सर्वसामान्य लोकांमध्ये प्रबोधन करण्याच्या उद्देशाने हे पुस्तक लिहिण्यात आल्याची माहिती संपादक व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.मोहन जोशी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT