swiggy.jpeg 
मुंबई

स्विगी, झोमॅटोच्या कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी सक्तीची

कुलदीप घायवट

मुंबई: ऑनलाईन पद्धतीने मागविलेले जेवण व अत्यावश्यक पुरवठ्याची घरपोच सेवा 24 तास सुरू ठेवण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे स्विगी आणि झोमॅटोमधील कर्मचारी पार्सल घेऊन हॉटेल, रेस्टॉरंट ते घरपोच सेवा देऊ शकतात. दरम्यान, या कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केले आहे. कर्मचाऱ्याने चाचणी केली नाही, तर त्याला कामावर रुजू करण्यात येणार नाही. त्यांचे ओळखपत्राचे नुतनीकरण होणार नाही, अशी नियमावली स्विगी, झोमॅटोकडून काढण्यात आली आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणी करून पार्सल सेवा देत आहेत. 

कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे मुंबईसह राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. वीकेंडला लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यात उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद ठेवण्याचे निर्देंश राज्य सरकारकडून देण्यात आले. मात्र, सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत पार्सल सेवा सुरू ठेवण्याची नियमावली जाहिर करण्यात आली होती. त्यानंतर पालिकेकडून ऑनलाईन पद्धतीने मागविलेले जेवण व अत्यावश्यक पुरवठ्याची घरपोच सेवा २४ तास सुरू राहणार आहे. 

तसेच रस्त्याच्या बाजूला असलेले खाद्यपदार्थ व फळांच्या स्टॉलवरून लॉकडाऊनच्या काळात पार्सल घेण्यास परवानगी असणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे पार्सल सेवा २४ तास करता येणार आहे. मात्र, काही ऑनलाईन कंपनी राज्य सरकारच्या निर्देशानुसार रात्री ८ नंतर पार्सल सेवा बंद करत आहेत. 

शिवडी येथील खासगी रुग्णालयातून आरटीपीसीआरची चाचणी केली आहे. चाचणीसाठी लागणारे 700 रुपये कंपनीकडून देण्यात येणार आहे. ज्यांनी चाचणी केली, त्यांना कामावर रूजू करण्यात येईल. त्यांचे ओळखपत्र नुतनीकरण करून देण्यात येणार आहे. हॉटेल, रेस्टारंट ते ग्राहकांच्या घरांपर्यंत कोरोना नियमांचे पालन करून पार्सल सेवा दिली जाते. आरटीपीसीआरचा नकारात्मक अहवाल मोबाइलसह कागदोपत्री सोबत ठेवला आहे. पोलीस किंवा अन्य प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी दाखविण्यासाठी याचा वापर केला जात आहे. 

काही कर्मचाऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणी केली आहे. मात्र, त्याचा निकाल अद्याप लागला नाही. जोपर्यंत त्याचा निकाल येत नाही. तोपर्यंत त्यांना कामावर रूजू करण्यात येणार नाही, याची खबरदारी कंपनीकडून घेण्यात येत आहे. कंपनीकडून कोरोना नियमांचे पालन करण्याचे प्रत्येकाला आवाहन केले आहे, असे स्विगीचा कर्मचारी शेखर रावले याने सांगितले. 

आरटीपीसीआरचा निकास नकारात्मक आला आहे. त्यामुळे पार्सल सेवेचे काम सुरू आहे. मात्र, ज्या कर्मचाऱ्यांचा निकाल सकारात्मक आल्यास त्यांना क्वरंटाईन केले जाते. मात्र, यावेळी कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी क्वारंटाईन कालावधीत दररोज 500 रुपये खात्यात दिले जातात. कंपनीकडून चाचणीसाठी पैसे देण्यात येत आहेत. मात्र, मी सरकारी रुग्णालयात चाचणी करून कंपनीचे पैसे वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या हॉटेल, रेस्टारंटमधून येणारी पार्सलची संख्या नेहमीसारखी आहे. 

मात्र, काही वेळा मनुष्यबळ पडत असल्याने दमछाक होते. पूर्वी एकाच ठिकाणच्या पार्सल वाहतूकीच्या सेवा अधिक असायच्या मात्र, आता मुंबईतून नवी मुंबई अशा लांब पल्ल्यांच्या पार्सलची सेवा सुरू आहे. आताच्या घडीला सध्या दिवसाला 1 हजार ते 1 हजार 500 रुपये मिळकत मिळते, असे झोमॅटोच्या कर्मचारी सॅम्युलन याने सांगितले. 
राज्य सरकारने कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली होती. आता 10 एप्रिल पासून ॲन्टीजन चाचणीही ग्राह्य धरण्यात येणार आहे, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत तथा पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता यांनी नवीन सुधारणांचे आदेश काढले आहे. यामध्ये सार्वजनिक वाहतूक, खाजगी वाहतूक, चित्रपट, जाहिरात आणि चित्रवाणी मालिकांसाठी चित्रीकरण करणारे कर्मचारी, होम डिलिव्हरी सेवे मधील कर्मचारी, परीक्षा कार्यातील सगळे कर्मचारी व अधिकारी, लग्न समारंभातील कर्मचारी, अंतिम संस्कार करणारे कर्मचारी, खाद्य विक्री करणारे लोक, इतर कर्मचारी कथा कारखान्यातील कामगार, ई-कॉमर्स मधील व्यक्ती, बांधकाम क्षेत्रातील कर्मचारी आदींचा समावेश आहे.

(संपादन - दीनानाथ परब)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आज सोनं-चांदी स्वस्त! चांदीचा भाव 2 लाखांच्या खाली; सर्वसामान्यांना दिलासा; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

IPL 2026 Auction live : कहानी मे ट्विस्ट... BCCI ने ६ परदेशी खेळाडूंसह १९ जणांना घुसवले, गौतम गंभीरने 'नाकारले'ला तोही आला...

Latest Marathi News Live Update : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस बदल्यांची शक्यता?

Ichalkaranji Drinking Water Issue : देवाभाऊ आले इचलकरंजीच्या पाणीप्रश्नावर बोलले आणि गेले, इचलकरंजीला पाणी देण्याचं आश्वासन पूर्ण होणार?

Kolhapur Cyber Crime : मुंबई पोलिस–न्यायालयाचा सेट! निवृत्त प्राध्यापकाचा व्हिडिओ कॉलवरून छळ, भीतीने ७९ लाख दिले अन्

SCROLL FOR NEXT