मुंबई

कोरोनाच्या लढाईसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

तुषार सोनवणे

मुंबई - राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस रौद्र रुप धारण करीत आहे. मोठ्या शहरांमध्ये थैमान घातलेल्या कोरोनाचा संसर्ग आता निमशहरी आणि ग्रामिण भागातही पसरत चालला आहे. आताच काही जिल्ह्यांमधील संसर्ग 5 हजाराच्या पार गेला आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कोरोना चाचणी प्रयोगशाळा असणं गरजेचे झाले आहे. कोरोनाशी दोन हात करायचे असतील तर, मोठ्य़ा संख्येने चाचण्या करणे गरजे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या कोविड – 19 आरटीपीटीसीआर या प्रयोगशाळेचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या प्रयोगशाळेच्या उद्घाटनावेळी जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे उपस्थित होते.

कोरोनाचा संसर्ग राज्यात सुरू झाला तेव्हा म्हणजेच मार्च महिण्यात राज्यात फक्त दोनच कोविड चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळा होत्या. आज राज्यात 110 प्रयोगशाळा आहेत. पुढच्या काही दिवसांत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये कोविड तपासणीसाठी प्रयोगशाळा उभारण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी उद्घाटनावेळी सांगितले. राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात सोईसुविधांची उभारणी करण्यात आली आहे.  या सुविधा उपचारासाठी कायमस्वरूपी करण्यात येणार असल्याच्या सुचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

जालना जिल्ह्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात उद्घाटन करण्यात आलेल्या बीएसएल -3 या अत्याधुनिक प्रयोगशाळेमुळे जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन, कोरोना रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT