corona update sakal media
मुंबई

मुंबईत कोरोना रुग्णवाढ! पाॅझिटिव्हीटीचा दर एक टक्क्याच्या वर

भाग्यश्री भुवड

मुंबई : कोरोनाची तिसरी लाट (corona third wave) येण्याची शक्यता असताना मुंबईत आता पुन्हा नवीन कोरोना रुग्णांचा (new corona patient increases) आलेख वाढू लागला आहे. अवघ्या 10 दिवसांत नवीन रुग्णांमध्ये 27 टक्के वाढ दिसून आली आहे. या वाढत्या रुग्णांमध्ये, शनिवारी मुंबईतील पाॅझिटिव्हीटीचा (positivity) दर एक टक्क्याच्या वर गेला आहे.

जुलै प्रमाणे ऑगस्टच्या सुरुवातीला मुंबईत कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या 300 वर गेली होती. तर, काही दिवसांपूर्वी रुग्णसंख्या 200 च्या खाली होती. पण, गेल्या चार दिवसांपासून नवीन कोरोना रुग्णांचा आलेख दररोज 300 च्या वर आहे. शनिवारी 388 नवीन कोरोना रुग्ण सापडले असून 4 लोकांचा मृत्यू झाला. तर, 10 दिवसांपूर्वी 18 ऑगस्ट रोजी 283 नवीन कोरोना रुग्ण सापडले होते. या आकडेवारीनुसार केवळ 10 दिवसात नवीन प्रकरणांमध्ये 27 टक्के वाढ दिसून आली. त्याचप्रमाणे, पाॅझिटिव्हीटीचे प्रमाण देखील वाढले आहे. 18 ऑगस्ट या दिवसापर्यंत, कोरोना चाचणीचा पाॅझिटिव्हीटीचा दर एक टक्क्यापेक्षा कमी म्हणजे 0.73 टक्के होता, जो 10 दिवसांत 1 टक्क्यांहून अधिक झाला. शनिवारी पाॅझिटिव्हीटी दर 1.03 टक्के होता.

दुप्पटीचा दरही झाला कमी

कोरोना रुग्णांचा दुप्पट होण्याचा कालावधी म्हणजेच दुप्पट दर देखील कमी झाला आहे. 18 ऑगस्ट रोजी मुंबईचा दुप्पट दर कालावधी 2057 दिवस होता. 10 दिवसांत हा दुप्पट दर 344 दिवसांनी कमी झाला असून शनिवारी मुंबईचा दुप्पट दर 1713 दिवस होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT