मुंबई

धारावीकरांनो सावधान! ही धक्कादायक बातमी आली समोर...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : धारावीत रविवारी कोरोनाचे आणखी दोन रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णांची संख्या 5 झाली आहे. त्याशिवाय धारावीच्या आसपासच्या परिसरातही 2 बाधित रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. दरम्यान, पालिकेने या परिसरात हेल्थ कॅम्प सुरू करून संशयितांची तपासणी सुरू केली आहे. 

धारावीतील डॉ.बलिगा नगर, वैभव अपार्टमेंटमध्ये 2 रुग्ण सापडल्यानंतर आज मदिना नगर आणि मुकुंद नगरमध्ये आणखी दोन कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने परिसरात संसर्ग वाढला आहे. मदिनानगर मधील 21 वर्षीय तरुणाला; तर मुकुंद नगरमधील 48 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याने त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पालिकेने हा परिसर सील केला असून तेथील लोकांची तपासणी सुरू केली आहे. 

डॉ. बलिगा नगरमध्ये अडीच हजाराहून अधिक लोकसंख्या आहे. त्यात 132 ज्येष्ठ नागरिक असून 32 जणांमध्ये सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे आढळली आहेत. त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी परळ येथील हाफकीन इन्स्टिट्यूटमध्ये पाठवण्यात आले आहेत. धारावी आणि परिसरात एकूण 7 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. पालिकेच्या सर्वेक्षणात 57 जण हाय रिस्क आणि 187 जण लो रिस्क संपर्कात आल्याचे समोर आले आहे. या परिसरातील 3450 लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे

Corona two more in Dharavi

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani GNM Paper Leak : परभणीत नर्सिंगचा पेपर फुटला, सुपरवायझरने बहिणाला WhatsApp वर प्रश्नपत्रिका पाठवली अन्... चौघांना अटक

IND VS SL 2ND TEST : हाताला पट्टी, मनात जिद्द! Rishabh Pant ला मैदानावर पाहून श्रीलंकन थरथरले; त्यात थोडक्यात विकेट हुकल्याने आणखी घाबरले Video

Mumbai: मुंबईत गणरायाच्या आगमनात संतापजनक प्रकार! मिरवणुकीत इमारतीवरून अंडी फेकल्याचा आरोप; माझगावमध्ये तणावाचे वातावरण

Marathi News Live Updates : वैजापुरात कचोरीत उंदराची विष्ठा आढळल्याने खळबळ

ST Bus : सहली, लग्नसोहळे, यात्रांचा प्रवास महागला! एसटीच्या प्रासंगिक करार भाड्यात ११ ते १९ रुपयांनी वाढ

SCROLL FOR NEXT