sheetal gambhir desai sakal media
मुंबई

दोन लशी घेतलेल्यांना रोजची रेल्वे तिकिटे द्यावे; भाजप महिला मोर्चाची मागणी

कृष्ण जोशी

मुंबई : कोरोनाच्या दोन लसी (corona two vaccine) घेतलेल्यांना देखील रेल्वेची तिकिटे (railway ticket) न देण्याचा राज्य सरकारचा (mva government) धरसोड मालिकेतील निर्णय अत्यंत संतापजनक असून त्याने आजपासून तिकीट खिडक्यांवर मोठे वादंग सुरू झाले आहेत. त्यामुळे सरकारने हा निर्णय (Government decision) त्वरित मागे घेऊन दोन लसी घेतलेल्यांना रोजचे रेल्वे तिकीट द्यावे, अशी मागणी मुंबई भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष शीतल गंभीर देसाई (Sheetal Gambhir desai) यांनी केली आहे.

कोवीड च्या दोन लसी न घेतलेल्यांना अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही कालपर्यंत तिकिटे दिली जात होती. मात्र आता राज्य सरकारच्या निर्णयानुसार लस न घेतलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना देखील उपनगरी रेल्वेची तिकीटे मिळणार नाहीत. त्यांनादेखील दोन लसी घेतल्या तरच फक्त रेल्वे पास मिळतील. त्याचप्रमाणे कोवीड लस न घेतलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना तर रेल्वे पास देखील मिळणार नाहीत. या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे. त्यामुळे आज विविध ठिकाणच्या रेल्वे खिडक्यांवर प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी यांची जोरदार वादावादी झाल्याचे चित्र होते. त्यासंदर्भात देसाई यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

राज्य सरकारने यापूर्वी देखील धरसोड मालिकेत घेतलेल्या अनेक उलटसुलट निर्णयांमुळे नागरिकांना मोठा त्रास झाला आहे. आताचा निर्णयही त्याच मालिकेतील आहे. जर दोन लसी घेतलेल्यांना रेल्वे पास मिळतो तर त्यांना तिकीट का मिळू नये, हे अत्यंत अनाकलनीय आहे. दोन लसी घेतलेल्यांना आता विमान प्रवास, मॉल, मंदिर प्रदेश खुला झाला आहे. राज्यात आता कंपन्या, कार्यालये, दुकाने हॉटेल, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालये सुरू झाले आहेत. सर्व जीवनचक्र सुरू होत असताना केवळ रेल्वे प्रवाशांची अडचण सरकार का करीत आहे, असा प्रश्नही देसाई यांनी विचारला आहे.

आता मुंबई महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. मुंबई महाराष्ट्रात जवळपास सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. त्यामुळे आता कोरोना सोबतच जगायची तयारी सरकारने ठेवायला हवी. टीबी, विविध प्रकारचे ताप, रेबीज, एड्स, हृदय विकार, डायबिटीस अशी रोगांसोबत आपण जगतो. तसेच कोरोनासोबतही जगणे सरकारने लोकांना शिकवले पाहिजे. त्यासाठी आहेत ते निर्बंध हळूहळू शिथिल केले पाहिजेत. ते न करता सरकार उलटे चक्र फिरवीत असून हे योग्य नाही. त्यामुळे आता दोन लसी घेतलेल्यांना देखील सरकारने उपनगरी रेल्वेची तिकीटे उपलब्ध करून द्यावीत. अन्यथा या विषयावर आंदोलन केले जाईल, असा इशाराही देसाई यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

Pali News : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा सूत्रधार शोधण्यासह इतर मागण्यांचे तहसीलदारांना अंनिसकडून निवेदन

School Blast: शाळेबाहेर स्फोटके! विद्यार्थ्याने फेकताच भीषण स्फोट, महिला आणि विद्यार्थी जखमी

Maharashtra Latest News Update: नाशिकमधील गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटवला

SCROLL FOR NEXT