मुंबई

कोरोना नियंत्रणातच, मुंबई महापालिका आयुक्तांचा दावा

समीर सुर्वे

मुंबई: मुंबईतील कोविड नियंत्रणात आहे. 11 सप्टेंबरला रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 56 दिवसांचा होता तो 11 ऑक्‍टोबरला ९ दिवसांवर आला  असल्याचा दावा मुंबई महानगर पालिका आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांनी केला.

महिन्याभरात मुंबईत मृत्यूदर 2.1 आहे. तर,आता पर्यंतचा मृत्यूदर 4.14 टक्के आहे. सप्टेंबर महिन्यात 74 टक्के रुग्णांनी कोविडवर मात केली होती. 11 ऑक्‍टोबर पर्यंत 85 टक्के रुग्णांनी कोविडवर मात केली आहे. मुंबईत कोविडचा संसर्ग वाढत असल्याचा आरोपाबाबत आयुक्तांनी आज आकडेवारीसह कोविड नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले.

मुंबईत सध्या 2 हजारच्या आसपास रुग्ण सापडत आहे. मात्र,कोविडच्या चाचण्या वाढवल्यामुळे रुग्णसंख्या वाढलेली दिसते. सप्टेंबर महिन्यात सरासरी 7 हजार चाचण्या होत होत्या. त्या आता 12 हजार 500 पर्यंत वाढविण्यात आल्या असून लवकरच चाचण्याची संख्या 16 ते 18 हजार पर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.

आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांनी मुंबईतील कोविड नियंत्रण असल्याचा दावा आकडेवारीसह केला आहे.

11 सप्टेंबर रोजी कोविडचे उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या 26 हजार 632 होती.तर,11 ऑक्‍टोबर रोजी 22 हजार 369 ऍक्‍टिव्ह रुग्ण आहेत.

11 सप्टेंबर रोजी कोविडसाठी राखीव असलेल्या 4165 खाटा रिक्त होत्या.त्यात,85 आयसीयू खाटांचाही समावेश आहे.तर,11 ऑक्‍टोबर रोजी 4922 खाटा रिक्त असून यात 257 आयसीयू बेड्‌सचाही समावेश आहे.

11 सप्टेंबर पर्यंत कोविडच्या 8 लाख 87 हजार चाचण्या झाल्या होत्या.तर,  11 ऑक्‍टोबर १२ लाख ६१ हजार चाचण्या झाल्यात.

----------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Corona under control claims Mumbai Municipal Commissioner

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ration Distribution: रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्ट ते ऑक्टोबरचे तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी मिळणार; वितरणात मोठा बदल

Latest Marathi News Live Update : पालखीच्या पुणे मुक्कामादरम्यान 72 संशयित चोर पोलिसांच्या ताब्यात

Pune Wari: टाळ-मृदंग, हरिनाम आणि रांगोळ्यांच्या पायघड्या; हडपसरमध्ये पालखी सोहळ्याला भक्तिमय स्वागत

Tanvi Khanna Exclusive: 'जानेवारीत जिच्याकडून हरले, तिलाच फायनलमध्ये हरवलं', शस्त्रक्रिया, बदलतं Squash अन् कमबॅकवर तन्वी झाली व्यक्त

Pune Ness: ना गटार स्वच्छ, ना जाळी दुरुस्त! पुण्यात महापालिकेच्या निष्काळजीपणाचा फटका तुटलेल्या जाळीत पाय अडकून पादचारी जखमी

SCROLL FOR NEXT