Corona test
Corona test sakal media
मुंबई

BMC : परदेशी प्रवाशांचे संस्थात्मक अलगीकरण; दर दोन दिवसांनी चाचणी

समीर सुर्वे

मुंबई : परदेशातून आलेल्या प्रत्येक प्रवाशांचे (commuters from abroad) आता संस्थात्मक अलगीकरण (institutional quarantine) करण्यात येणार आहे. या प्रवाशांची दर दोन दिवसांनी कोविड चाचणी (corona test) करण्या बरोबर कोविड बाधीत व्यक्ती आढळल्यास जिनोम चाचणीही (Genome testing) करण्याचा निर्णय महानगरपालिकेने (bmc) घेतला आहे. त्याचबरोबर नव्या व्हेरीयंटचा (corona new variant) एक रुग्ण जरी आढळला तरी संपूर्ण इमारत सिल करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.

दक्षिण अफ्रिकेसह काही देशात कोविड विषाणूचा नवा प्रकार (व्हेरीयंट )आढळला आहे. ओमीक्रॉन या व्हेरीयंटमुळे जगभरात पुन्हा कोविडचे सावट गडद होऊ लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर महानगर पालिकेनेही तयारी सुरु केली आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांनी जर कोविड लसीचे दोन डोस घेतले असतील तर त्यांना आतापर्यंत घरी जाण्याची परवानगी दिली जात होती. मात्र,आता पूर्वी प्रमाणे संस्थात्मक अलगीकरण करण्यात येईल. तसेच, दर दोन दिवसांनी या प्रवाशांची कोविड चाचणी करण्यात येणार आहे, असेही सांगण्यात आले.

राज्याचे नगविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई महानगर प्रदेशातील सर्व पालिका आयुक्त,जिल्हाधिकारी,सीईओंची तातडीची बैठक आज बोलवली होती.त्यात,मुंबई पालिकेकडून अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी परदेशी प्रवाशांच्या संस्थात्मक विलगीकरणाची माहिती दिली.

फायर ऑडीट

मुंबईतील सर्व रुग्णालये,कोविड केंद्रांचे स्ट्रक्‍चरल,फायर आणि इलेक्‍ट्रीक ऑडीट करण्यात येत आहे.त्यानुसार आवश्‍यक कार्यवाही करण्यात येत आहे.

व्हेंटीलेटर

रुग्णालयात आवश्‍यक कृत्रिम प्राणवायू,व्हेंटीलेटरस इतर सर्व यंत्रणांचा आढावा घेण्यात येत असून ते सज्ज ठेवण्यात येतील.

स्वतंत्र कक्ष

या व्हेरीअंटचा रुग्ण आढळल्यास त्यावर स्वतंत्र कक्षात उपचार करण्यात येतील.त्यासाठी तयार करण्यास सुरवात झाली आहे.

परदेशातून आलेल्या प्रवाशांचा शोध

अतिजोखमीच्या देशातून गेल्या 14 दिवसात आलेल्या प्रवाशांची माहिती राज्य सरकारकडून महापालिकेला दिली जाणार आहे. त्यानुसार या प्रवाशांचा आढावा घेतला जाईल.सध्याही पालिकेकडून या प्रवाशांची नियमीत विचारपूस केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधी ते हिंदूंशी लढले अन् आता ख्रिश्चनांशी... PM Modi यांनी रविवारच्या सुट्टीवरून कोणावर साधला निशाना?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील पार्किंगमध्ये अनेक गाड्या जळून खाक

Jackfruit Worst Combination : फणस खाल्ल्यानंतर 'या' गोष्टींचे सेवन करणे टाळा, अन्यथा पचनाच्या समस्यांना मिळेल आमंत्रण

Manoj Jarange : पुन्हा उपोषणावर मनोज जरांगे ठाम

Share Market Opening: शेअर बाजार लाल रंगात उघडला; बँक निफ्टी 48,900च्या जवळ, कोणते शेअर्स तेजीत?

SCROLL FOR NEXT