Corona Update Mumbai Airport is ready to prevent spread of Covid regulations applicable Mumbai airport
Corona Update Mumbai Airport is ready to prevent spread of Covid regulations applicable Mumbai airport esakal
मुंबई

Corona Update : कोव्हीड प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई विमानतळ सज्ज !

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जगातील काही देशांमध्ये कोव्हिडच्या रूग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने खबरदारी म्हणून आरोग्य मंत्रालयाने कोव्हीड संदर्भात आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहे. त्यानुसार, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाने कोव्हिड विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. शनिवारपासून मुंबई विमानतळावर कोव्हीड नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.

कोव्हीड संदर्भात आरोग्य मंत्रालयाने

जारी केलेल्या नवीनतम मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून आणि सध्याच्या कोव्हीड-19 परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, मुंबई विमानतळाने कोव्हीड विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी एकत्रित उपाययोजना केल्या आहेत. 24 डिसेंबरपासून अंमलात आणलेल्या नवीनतम मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे, मुंबई विमानतळ येथे येणार्‍या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांपैकी दोन टक्के प्रवाशांना विमानतळावर पोस्ट-अरायव्हल चाचणी करावी लागेल.

अशा प्रवाश्यांना त्यांच्या संबंधित एअरलाइन्सद्वारे ओळखले जाईल आणि त्यांच्या आरटी-पीसीआर चाचण्यांसाठी एअरलाइन्सच्या कर्मचार्‍यांनी टर्मिनलच्या एका समर्पित भागात मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रवाशांनी नमुने सबमिट करणे आणि पुढील प्रवास सुरू ठेवणे आवश्यक आहे. चाचणी निकालांची डिजिटल प्रत थेट प्रवाशांना पाठवण्याची तरतूद प्रयोगशाळेने केली आहे.

सीएसएमआयए येथे आंतरराष्ट्रीय आगमन प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी सुविधा आरोग्य तपासणी काउंटरनंतर, प्री-इमिग्रेशन परिसरात, आंतरराष्ट्रीय आगमन कॉन्कोर्समध्ये असणार आहे. प्रवाशांसाठी चाचणी सुविधा चोवीस तास विनामूल्य उपलब्ध असणार आहे.

सीएमएमआयएने कोव्हीड-19 चाचणीसाठी आयसीएमआर आणि एनएबीएल मान्यताप्राप्त प्रयोगशाळा नियुक्त केली आहे. विमानतळाने कोव्हीड-19 चाचणी प्रक्रियेसाठी 6 नोंदणी काउंटर आणि 03 सॅम्पलिंग बूथची व्यवस्था केली आहे. प्रतिबंधात्मक उपायांवरील संदेश आणि नवीनतम सूचना प्रवाशांना टर्मिनल आणि सीएमएमआयएच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT