Corona Vaccination
Corona Vaccination sakal media
मुंबई

केंद्रांवर लसच नाही, मुंबईकरांमध्ये संतापाची भावना

भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईत पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध (Corona Vaccine) नसल्याने आज दिवसभरात अनेक ठिकाणी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांमध्ये गोंधळ (People Irritation) आणि संतापाचे वातावरण पाहायला मिळाले. बर्‍याच लसीकरण केंद्रांवर (Vaccination Drive) आज लसीकरण मोहिम बंद होती. ज्यामुळे सकाळपासून रांगेत प्रतिक्षा करणार्‍या अर्ध्याहून अधिक नागरिकांना लस मिळालीच नाही. दरम्यान, अनेक टप्प्यातील लसीकरण सुरू झाल्याकारणाने मुंबईत लसीचे डोस (Corona Vaccine Dose) कमी पडू लागले आहेत. परदेशात शिकण्यासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांचेही लसीकरण प्राधान्याने केले जात आहे. पण, आज त्यांनाही त्रास सहन करावा लागला. ( Corona Vaccine Dose not available at centers people get irritated )

पालिकेच्या कूपर रुग्णालयात जवळपास 250 हून अधिक विद्यार्थ्यांनी लसीकरणासाठी गर्दी केली होती. पण, अचानक लस संपल्याचे सांगितल्यावर या विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. शिवाय, इतर वयोगटातील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने काही काळासाठी तिथे तणावाचे वातावरण झाले होते. पालिकेच्या केईएम रुग्णालयातही आज दिवसभर लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. मात्र, तिथेही नागरिकांनी गर्दी केली होती. पण, लस उपलब्ध नसल्याचे सांगत नागरिकांना घरी किंवा इतर ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले.

मुंबईत पुन्हा लसीचा तुटवडा, बहुतेक केंद्रे बंद

पुन्हा एकदा मुंबईत कोरोना लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे.  अवघ्या 6 महिन्यांत मुंबईत लसीची कमतरता भासण्याची ही तिसरी वेळ आहे. शुक्रवारी राज्य सरकारकडून मिळालेल्या लसीचा साठा सोमवारी जवळपास सर्वच केंद्रांवर संपला. यामुळे, अनेक लाभार्थ्यांना केंद्रांमधून लसविना परतावे लागले. लसीअभावी महापालिकेची सर्व लसीकरण केंद्रे गुरुवारी बंद होती. शुक्रवारी पहाटे दीड लाख डोस राज्य सरकारकडून मिळाल्यानंतर शुक्रवारी दुपारी अडीचपासून सर्व केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात आले, परंतु हा साठा तीन दिवसही टिकू शकला नाही. लसीच्या कमतरतेमुळे सोमवारी पुन्हा अनेक लसीकरण केंद्रांवर लस संपल्याचे फलक पाहायला मिळाले.

गोरेगाव येथील नेस्को लसीकरण केंद्रामध्ये दुसरा डोस घ्यायला गेलेल्या उमा दत्त तिवारी यांना लसीसाठी बराच संघर्ष करावा लागला. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने नेस्को केंद्रांवर लाभार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती. केईएम रुग्णालयाच्या लसीकरण केंद्राचीही अशीच परिस्थिती आहे. केईएम केंद्रांमध्ये रांगा लावल्यानंतरही अनेक लाभार्थ्यांना ही लस मिळू शकली नाही. संध्या भुवड नावाच्या 45 वर्षांच्या लाभार्थीने सांगितले की, गेले कित्येक दिवस त्या दुसऱ्या डोससाठी येत आहे पण डोसविनाच परतावे लागले. त्यांचा नंबर येताच कर्मचार्‍यांनी सांगितले की ही लस संपली आहे. गोवंडीतील शिवाजी नगर लसीकरण केंद्रही सोमवारी बंद राहिले. येथे केंद्र सुरू झाल्यानंतर काही तासांनंतर, लस संपल्याचा बोर्ड लावण्यात आला.

महानगरपालिकेचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी लस नसल्यामुळे बहुतेक लसीकरण केंद्रे बंद असल्याच्या बाबीला दुजोरा दिला. सोमवारी ज्या केंद्रांवर लस उपलब्ध होती तेथेच लसीकरण सुरू आहे.  रोजच्या तुलनेत सोमवारी लसीकरणात लक्षणीय घट झाली असल्याचे त्यांनी सांगितले. गोमारे यांनी सांगितले की, सोमवारी सायंकाळपर्यंत पुण्याहून अधिक लसीचा साठा अपेक्षित आहे.

विद्यार्थ्यांनाही त्रास

परदेशात अभ्यासासाठी जाणार्‍या मुंबईतील विद्यार्थ्यांनाही कोरोना लस घेण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागला. लस घेण्यासाठी कूपर रुग्णालयात दाखल झालेल्या बर्‍याच विद्यार्थ्यांना विनालस परतावे लागले. लसीकरण केंद्राचे प्रभारी डॉ. शेनॉय यांनी सांगितले की लसीचा डोस मर्यादित असून विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, म्हणून काहींना परत पाठवावे लागले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: लॉकी फर्ग्युसनने तोडली रचिन-रहाणेची पार्टनरशीप, चेन्नईला तिसरा धक्का

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT