corona death  sakal media
मुंबई

मुंबईतील पाच वॉर्डमध्ये मृत्यूचे थैमान; सरासरी ९०० हून अधिक कोरोना बळी!

2 वॉर्डमध्ये 50 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

भाग्यश्री भुवड

मुंबई : कोरोना व्हायरसच्या (corona virus) संसर्गाचे हॉटस्पॉट (hotspot) ठरलेल्या मुंबईत मृत्यूंची संख्या (corona deaths) आता 15 हजारांहून अधिक आहे.  मुंबई (Mumbai) शहराच्या 24 वॉर्डांपैकी 5 वॉर्ड (wards) असे आहेत जिथे सर्वाधिक मृत्यूची नोंद होत आहे. मुंबई शहरात होणारे 50 टक्यांहून अधिक मृत्यू हे या पाच वॉर्डातले असल्याची माहिती समोर आली आहे. या पाच वॉर्डमध्ये मृत्यूंची संख्या (death average) सरासरी 900 च्या वर नोंद करण्यात आली आहे.

के पूर्व म्हणजेच अंधेरी पश्चिम परिसरात आतापर्यंत हजाराच्या वर 1, 239 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर, एकूण 46, 204 एवढ्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्याखालोखाल एस वॉर्डमध्ये भांडूप परिसरात 1030 एवढ्या मृत्यूंची नोंद करण्यात आली असून एकूण रुग्णसंख्या 33, 610 एवढी आहे. त्यासह बोरीवली परिसराचा समावेश असणाऱ्या आर सी वाॅर्डमध्ये 984 मृत्यूंची नोंद करण्यात आली असून आतापर्यंत 51 हजार 433 एवढे रुग्ण नोंदले गेले आहेत.

पालिकेच्या डॅशबोर्डनुसार एकूण पाच वाॅर्डमध्ये अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. 961 मृत्यू झालेल्या गोरेगाव परिसराचा समावेश असणाऱ्या पी दक्षिण वॉर्डात एकूण 44,547 रुग्ण नोंदले आहेत. तर, आर एस म्हणजेच कांदिवली परिसरात 928 मृत्यू नोंदवण्यात आले असून 45 हजार 688 कोरोना रुग्ण आहेत. दरम्यान, आतापर्यंत मुंबईत एकूण कोरोना रुग्णांची संख्या 7 लाख 38 हजार 522 झाली आहे. तर, 7 लाख 17 हजार 191 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

रुग्णसंख्या नियंत्रणात

दरम्यान, सध्या मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली असून 300 च्या दरम्यान रुग्ण आढळत आहेत. तर, मृत्यूही एक अंकी नोंद होत आहे. तर, 10 दिवसांत फक्त 67 मृत्यूंची नोंद झाली आहे.

सक्रिय रुग्णही घटले

मुंबईत सक्रिय रुग्ण दुपटीने घटले असून सद्यस्थितीत 2,928 रुग्ण आहेत. ही संख्या जुलै महिन्यात 4,972 एवढी होती. तर, प्रत्येक वाॅर्डमध्ये सरासरी 200 पर्यंत सक्रिय रुग्ण नोंदले आहेत. .

ए वॉर्ड रुग्णवाढीचा दर जास्त

गेल्या सात दिवसांत कुलाबा म्हणजेच ए वॉर्डमध्ये रुग्णवाढीचा दर इतर वॉर्डच्या तुलनेत जास्त नोंदवण्यात आला आहे. मुंबईचा सरासरी रुग्णवाढीचा दर 0.04 %पर्यंत आहे. पण, ए वॉर्डमध्ये रुग्णसंख्या कमी असली तरी रुग्णवाढीचा दर 0.08 % एवढा आहे. शिवाय, रुग्ण दुपटीचा कालावधी ही 920 दिवसांवर आहे. बाकी सर्व वॉर्डमध्ये रुग्ण दुपटीचा दर हजारच्या वर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

Pune News : ‘करमाफी’चे अधिकार अधिकाऱ्यांना देण्याचा घाट; विरोधकांचा तीव्र विरोध

Gangapur Crime : मुलीच्या प्रेमविवाहास मदत करणाऱ्या युवकाचा खून करणाऱ्या पाच आरोपींपैकी तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा

Sindkhed Raja Crime : अवैध बायोडिझेल साठ्यासह २ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; समृद्धी महामार्ग लगत सुरू होती विक्री

SCROLL FOR NEXT