corona virus lockdown help to people in kalyan 
मुंबई

ग्रामीण भागातील नागरिकांना मदतीचा हात...

मयुरी चव्हाण-काकडे

कल्याण: लॉकडाऊन मुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहे. नाका कामगार, रिक्षाचालक व हातावर पोट असणा-या गरीबांसमोर असंख्य अडचणी उभ्या राहिल्या आहेत. एकीकडे शहरात लॉकडाऊन असतानाही लोक जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर गर्दी करत आहेत. मात्र, शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागात वस्तू खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसेच नसल्याचे चित्र आहे. अशा विविध गावात रोज जाऊन तेथील नागरिकांना अन्नधान्य आणि मास्क वाटप करण्यासाठी गावातील तरुण एकवटले आहेत.

डोंबिवली नजीक असलेल्या घारीवली गावचे रहिवासी तथा माजी सरपंच योगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आसपासच्या गावातील तरुण एकत्र आले आहेत. संकट काळात गावातील तरुणांनी एकत्र येत ग्रामस्थांना आधार दिला पाहिजे, या विचारातून सुमारे 15 ते 20 युवक रोज वेगवेगळ्या गावात जाऊन जीवनावश्यक वस्तू व मास्कचे वाटप करत आहेत. रोज एक गाव निवडले जाते. त्या गावात जाऊन मदत करण्यासाठी आम्ही 4 ते 5 मुलांचा समूह करतो. रोज नवीन समूह केले जातात. आतापर्यंत आम्ही निळजे, वाकळण, संदप, घारीवली, उसरघर या गावात 3 हजार मास्क व 600 हून अधिक कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे, योगेश पाटील यांनी सांगितले.

राम पाटील, तन्मय पाटील, ओमकार पाटील,आवेश गायकर, विश्वनाथ रसाळ आदी तरुण या समूहात कार्यरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा आज दिल्लीकडे मोर्चा

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT